चार पोलीस कर्मचारी निलंबित

By Admin | Updated: July 18, 2016 23:50 IST2016-07-18T23:50:07+5:302016-07-18T23:50:07+5:30

अकोला न्यायालयाच्या आवारात पोलिसांसमक्ष झालेल्या हानामारीच्या घटनेची दखल घेत चार कर्मचारी निलंबित.

Four police personnel suspended | चार पोलीस कर्मचारी निलंबित

चार पोलीस कर्मचारी निलंबित

अकोला: न्यायालयाच्या आवारात गोपाल कदम याला पोलिसांसमोर झालेल्या हाणामारी प्रकरणातील चार पोलीस कर्मचार्‍यांना निलंबित केल्याची विश्‍वसनीय माहिती आहे. कृषी नगरमध्ये झालेल्या एका मारहाण प्रकरणाची न्यायालयात तारीख असल्याने गोपाल कदम हजर होता. यावेळी सोनू जाधव, धनंजय बिल्लेवार व त्यांच्या दोन साथीदारांनी कदमवर पोलिसांसमोर हल्ला चढविला होता. या प्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी मारेकर्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली; मात्र हा प्रकार पोलिसांसमोर घडल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी चार पोलीस कर्मचार्‍यांना निलंबित केल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

Web Title: Four police personnel suspended