आणखी चार पॉझिटिव्ह, तीन कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 18:18 IST2021-07-22T18:18:09+5:302021-07-22T18:18:26+5:30

Corona Cases in Akola : आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी चार पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने आतापर्यंत बाधित झालेल्यांची संख्या ५७,७३५ झाली आहे.

Four more positives, three corona-free | आणखी चार पॉझिटिव्ह, तीन कोरोनामुक्त

आणखी चार पॉझिटिव्ह, तीन कोरोनामुक्त

अकोला : जिल्ह्यात गुरुवार, २२ जुलै रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी चार पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने आतापर्यंत बाधित झालेल्यांची संख्या ५७,७३५ झाली आहे. दरम्यान, तीन जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून गुरुवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ११९ तपासणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी अकोला शहरातील चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत, तर उर्वरित ११५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. बुधवारी करण्यात आलेल्या ३८२ रॅपिड चाचण्यांमध्ये एकही पॉझिटिव्ह आढळून आला नाही.

४८ ॲक्टिव्ह रुग्ण

गुरुवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तीन जणांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या ५६,५५४ झाली आहे. आता केवळ ४८ ॲक्टिव्ह रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Web Title: Four more positives, three corona-free