अकोल्यात आणखी चार कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 12:51 IST2020-12-07T12:51:05+5:302020-12-07T12:51:40+5:30

Akola CoronaVirus News आणखी  चार रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ९६७०  वर गेली आहे.  

Four more corona positive in Akola | अकोल्यात आणखी चार कोरोना पॉझिटिव्ह

अकोल्यात आणखी चार कोरोना पॉझिटिव्ह

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, सोमवार सात डिसेंबर रोजी  आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी  चार रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ९६७०  वर गेली आहे.  
 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे   ५६ अहवाल प्राप्त झाले. यापैकी चार रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ५२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये  एक महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये आदर्श कॉलनी येथील दोन, तोष्णीवाल लेआऊट येथील एकाचा समावेश आहे.


६५५अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण  ९६७०   जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ८७१७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २९८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६५५ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. 

Web Title: Four more corona positive in Akola