शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
2
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
3
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
4
मिचेल स्टार्कचा भेदक मारा, राहुल त्रिपाठी लढला! KKR समोर SRH २० षटकंही नाही टिकला
5
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
6
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
7
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
8
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
9
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
10
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
11
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
12
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
13
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
14
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
15
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
16
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
17
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
18
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
19
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
20
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध

संचारबंदीत महिला पोलीस अधिकाऱ्याच्या घरी चार लाखांची चोरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 11:06 AM

चार लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना रविवारी उघडकीस आली.

अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मलकापूर परिसरात असलेल्या कोठारी वाटिका क्रमांक ४ मध्ये रहिवासी असलेल्या महिला सहायक पोलीस निरीक्षक यांच्या निवासस्थानी चोरट्यांनी प्रवेश करून चार लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. याप्रकरणी खदान पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.महिला सहायक पोलीस निरीक्षक वीणा राहुल भगत या प्रसूती रजेवर असून, कोठारी वाटिका क्रमांक ४ मधील वैभव रेसिडन्सी येथे राहावयास आहेत; मात्र रविवारी चोरट्यांनी त्यांच्या या निवासस्थानाचे कुलूप चावीने उघडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटातील रोख ९६ हजार रुपये, सोन्याचे दागिने १३ तोळे असा एकूण चार लाखांचा मुद्देमाल लंपास केला. वीणा यांचे पती राहुल भगत यांचा बांधकाम व्यवसाय असून, त्यांची आई व वडील दोघेही मोठी उमरी येथे राहत असल्याने ते दोघेही आई वडिलांकडे गेलेले असताना चोरट्यांनी ही चोरी केली. याप्रकरणी खदान पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. खिडकीत ठेवलेली चावी घेऊन केला प्रवेशवीणा व राहुल भगत दोघेही मोठी उमरी येथे जात असताना त्यांनी घराला कुलूप लावल्यानंतर ती चावी त्यांच्याच घराच्या खिडकीत ठेवली होती. नेमकी हीच चावी चोरट्यांच्या हातात लागल्यानंतर भगत यांच्याच चावीने त्यांचे घर उघडून चोरट्यांनी आत प्रवेश करून चार लाखांचा मुद्देमाल पळविला. यावरून चोरट्याने त्यांच्यावर पाळत ठेवल्याची माहिती समोर येत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी