शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत भेटीपूर्वी पुतिन यांचे मोठे पाऊल; रशियाने भारतासोबत लष्करी कराराला दिली मान्यता
2
रुपयाची ऐतिहासिक घसरण! डॉलरच्या तुलनेत पहिल्यांदाच ९० च्या खाली, तुमच्या खिशावर कसा परिणाम होईल?
3
'शांतता करारासाठी कोणीही जिवंत राहणार नाही, युरोपला युद्ध हवे असेल तर रशिया तयार'; पुतिन यांचा युरोपला थेट इशारा
4
किमान पेन्शन १००० रुपयांवरुन ७,५०० रुपये होणार का? सरकारने लोकसभेत दिलं उत्तर
5
Nanded Crime: 'त्यांनी' सक्षमला बर्थडेला दिलं होतं गुलाबाचं 'काटेरी' झाड! हत्येचेच दिले होते संकेत; आईने सगळंच सांगितलं
6
झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ? हेमंत सोरेन अन् भाजपाच्या नव्या मैत्रीची चर्चा, पडद्यामागे हालचाली
7
Viral: रुग्णवाहिकेला येण्यास उशीर, लोकांनी हार आणि नारळ देऊन केला चालकाचा सत्कार, कुठं घडलं?
8
दोन गिधाडांची गोष्ट... जन्म हरयाणात, मुक्तता महाराष्ट्रात आणि स्थायिक मध्य प्रदेशात
9
Mumbai Crime: पोटच्या मुलीचा ब्लेडने गळा चिरला, वाचवायला गेलेल्या पत्नीवरही हल्ला; कशामुळे घडलं?
10
फ्लॅट सुरुवातीनंतर शेअर बाजार 'धडाम'! सेन्सेक्स १६० अंकांनी आपटला; निफ्टीही २५,९५८ च्या खाली
11
कोण आहे देवव्रत रेखे? अवघ्या १९ व्या वर्षी पूर्ण केलं दंडक्रम पारायण; मोदी-योगींनीही नावाजलं
12
कन्यादान होताच प्राजक्ताला अश्रू अनावर, लग्नातील भावुक करणारा क्षण, व्हिडीओ पाहून डोळ्यात येईल पाणी
13
धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनासाठी देओल कुटुंब हरिद्वारमध्ये; सनी-बॉबी VIP घाटावर करणार विधी
14
पलाश मुच्छल प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात, स्मृती मंधानासोबतच्या लग्नावर अजूनही मौनच
15
Ola-Uber ला टक्कर देण्यासाठी आली 'भारत टॅक्सी'; 'या' ठिकाणी ट्रायल सुरू, १० दिवसांत ५१ हजार चालकही जोडले
16
Canara Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹७९,५०० चं फिक्स व्याज; पाहा कोणती आहे ही स्कीम
17
भाजपानं सोनिया गांधींना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं; काँग्रेस उमेदवारासमोर उभं केलं आव्हान
18
धक्कादायक! ५ वर्षांत २ लाख खासगी कंपन्या बंद, केंद्र सरकारचा लोकसभेत खुलासा
19
BHU मध्ये रात्री उशिरा राडा, विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये दगडफेक, नेमकं काय घडलं?
20
'एका हॉटेलचे बिल दुसऱ्या हॉटेलमध्ये देता का?', कर्तव्यनिष्ठ महिला पोलिसाच्या कामगिरीची वरिष्ठांकडून दखल
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ‘फोर-जी’चा घोळ चव्हाट्यावर; चक्क सहा केबल पाइपचे आढळले जाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 12:14 IST

मनपाच्या तपासणीत एक-दोन नव्हे, तर चक्क सहा केबल टाकण्याचे पाइप आढळून आले आहेत.

अकोला: महापालिकेच्या परवानगीला धाब्यावर बसवित शहराच्या कानाकोपऱ्यात फोर-जी केबलचे जाळे टाकणाºया स्टरलाइट टेक कंपनीसह इतर मोबाइल कंपन्यांनी केलेली बदमाशी चव्हाट्यावर आली आहे. ‘लोकमत’मधील वृत्त लक्षात घेता, मनपा प्रशासन कारवाईसाठी चालढकल करीत असल्याचे पाहून आमदार रणधीर सावरकर यांनी मंगळवारी खोदकामाची तपासणी करण्याचे निर्देश जारी केल्यावर मनपाच्या तपासणीत एक-दोन नव्हे, तर चक्क सहा केबल टाकण्याचे पाइप आढळून आले आहेत. प्रकरणाचे गांभीर्य पाहता मनपाच्यावतीने रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीच्या व्यवस्थापकांविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दुसऱ्यांदा तक्रार नोंदविण्यात आली आहे.राज्य शासनाच्या महानेट प्रकल्पासाठी शहरात २६ किलोमीटर अंतर फोर-जी केबलचे जाळे टाकण्यासाठी स्टरलाइट टेक कंपनीच्यावतीने मनपाकडे रीतसर परवानगी अर्ज सादर करण्यात आला होता. या प्रकल्पासाठी कंपनीला कोणतेही शुल्क आकारू नये, असे तत्कालीन भाजप सरकारचे निर्देश असल्याची माहिती आहे. त्यानुषंगाने ९ डिसेंबर २०१९ रोजीच्या सर्वसाधारण सभेत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. मंजूर प्रस्तावानुसार कंपनीला केवळ एका पाइपद्वारे सिंगल केबल टाकण्याची परवानगी देण्यात आली आहे, हे येथे उल्लेखनीय. यादरम्यान, गत दीड ते दोन वर्षांपासून काही मोबाइल कंपन्यांच्यावतीने शहराच्या विविध भागात खोदकाम करून फोर-जी केबल टाकल्या जात असल्याने संबंधित कंपन्यांना मनपाने रीतसर परवानगी दिली का, असा प्रश्न उपस्थित झाला. मनपाने कोणत्याही मोबाइल कंपनीला परवानगी दिली नसल्याचे समोर आल्यानंतरही प्रशासन कारवाई करीत नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ने सातत्याने लावून धरले. त्यामुळे नाइलाजाने का होईना, २३ डिसेंबर रोजी बांधकाम विभागाच्यावतीने शहरात अनधिकृतपणे खोदकाम करणाºया रिलायन्स जिओ कंपनीविरोधात तक्रार नोंदविण्यात आली, हे विशेष.केबलसाठी सहा पाइप टाकले कसे?बांधकाम विभाग, अतिक्रमण विभागाने अशोक वाटिका ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावर जेसीबीद्वारे खोदकाम करून फोर-जी केबलसाठी टाकण्यात आलेले तब्बल सहा पाइप शोधून काढले. यामध्ये स्टरलाइट टेक कंपनीला केवळ एका पाइपद्वारे सिंगल केबल टाकण्याची अनुमती असताना या कंपनीचे दोन पाइप आढळून आले. उर्वरित चार पाइप रिलायन्स जिओ कंपनीचे असल्याचा दावा मनपाने केला आहे. मनपाची परवानगी नसताना कंपन्यांनी सहा पाइप टाकले कसे, पाइप टाकताना प्रशासन झोपेत होते का, असे नानाविध सवाल उपस्थित झाले आहेत.रिलायन्स विरोधात तक्रारी; कारवाई शून्यमनपाच्या परवानगीला ठेंगा दाखवित शहरात खोदकाम करणाºया रिलायन्स जिओ कंपनीविरोधात प्रशासनाने २६ जून व २३ डिसेंबर २०१९ रोजी पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदविल्या आहेत. २३ डिसेंबर रोजी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविल्यानंतरही २४ डिसेंबर रोजी मध्यरात्री १ ते सकाळी ६ वाजताच्या दरम्यान अशोक वाटिका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतच्या रस्त्यालगत रिलायन्स कंपनीने ‘ओएफसी’ केबल टाकण्यासाठी पाच ‘पीव्हीसी’ पाइप टाकल्याची तक्रार मनपाने २४ डिसेंबर रोजी कोतवाली पोलिसांत दिली आहे. मनपाने तक्रारी केल्यावरही कंपनीविरोधात ठोस कारवाई होत नसल्याचे चित्र आहे.पोलिसांनी करावा पंचनामाफोर-जी घोटाळ्याची व्याप्ती लक्षात घेता मनपाने रिलायन्स कंपनीने टाकलेल्या पाइपचा पंचनामा करण्याची विनंती पोलीस प्रशासनाकडे केली आहे. कंपनीच्या विरोधात वारंवार तक्रार दाखल केल्यावरही रात्री-अपरात्री केबल टाकण्याच्या प्रवृत्तीत वाढ होत असल्याने रिलायन्स कंपनीचे व्यवस्थापक प्रयागदत्त मिश्रा व नरसिंग ठाकूर यांच्याविरोधात कारवाई करण्याचेही तक्रारीत नमूद आहे.

आमदारांना द्यावे लागले निर्देशमनपात भाजपची एकहाती सत्ता आहे. गत आठ दिवसांपासून फोर-जी केबलचा मुद्दा ‘लोकमत’ने लावून धरल्यानंतरही सत्तापक्षाचे पदाधिकारी मोबाइल कंपन्यांवर कारवाई करण्यासाठी प्रशासनाला निर्देश देत नसल्याचे पाहून आमदार रणधीर सावरकर यांना समोर यावे लागले. मंगळवारी आ. सावरकर यांनी आयुक्त कापडणीस यांना सूचना दिल्यानंतर बांधकाम विभाग, अतिक्रमण विभागाने फोर-जी केबलसाठी टाकलेले पाइप शोधून काढले. ही बाब पाहता सत्ताधारी भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे चित्र समोर आले आहे.शहरात सर्वत्र फोर-जी केबलची कामे सुरू आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ घातला जात असल्याची दखल घेत मनपा आयुक्तांना तपासणी करण्याचे निर्देश दिले होते. अपेक्षेप्रमाणे घोळ समोर आलाच. प्रशासनाने रोखठोक भूमिका न घेतल्यास जबाबदार अधिकाºयांची खैर नाही, हे नक्की.-रणधीर सावरकर, आमदार.मनपाच्या तपासणीत स्टरलाइट टेक व रिलायन्स जिओ कंपनीने नियमांचे उल्लंघन केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. कंपन्यांना काम बंद करण्याचा आदेश दिला असून, पाइप जप्त केले आहेत. येत्या गुरुवारी दोन्ही कंपनीच्या प्रतिनिधींना मनपात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.-संजय कापडणीस, आयुक्त, मनपा.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाRandhir Savarkarरणधीर सावरकर