मूर्तिजापूर येथे फळांची चार दुकाने आगीत जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 18:11 IST2021-05-27T18:10:48+5:302021-05-27T18:11:33+5:30
Murtijapur News: फळांच्या दुकानाला आग लागून लाखोचे नुकसान झाले.

मूर्तिजापूर येथे फळांची चार दुकाने आगीत जळून खाक
मूर्तिजापूर : येथील बसस्थानकाच्या मागच्या बाजूला असलेल्या चार फळे विक्री दुकानाला गुरुवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास अचानक आग लागून त्यातील फळे व खोके वजा दुकाने जळाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
बस स्थानकाच्या मागच्या बाजूला असलेले फळांच्या ४ दुकानाला दुपारी ३ वाजता अचानक आग लागली. आगीची माहीती नगर सेवक सुनिल लशुवाणी यांनी नगर परिषद मुख्याधिकारी विजय लोहकरे यांना दिली असता त्यांनी घटनास्थळी तात्काळ अग्नि शमन दलाला पाठवून आग आटोक्यात आणली. अचानक लागलेल्या आगीत दुकानातील फळे, वजन काटे, हातगाडी यासह लोखंडी व लाकडी दुकान खोके आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. यात किमान दोन लाख रुपयाच्यावर नुकसान झाल्याची माहिती आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी नगर परिषदेच्या अग्नी शमन, नगरसेवक सुनील लशुवाणी, सेनापती व सहकाऱ्यांनी परीश्रम घेतले.