शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

मलेरिया विभागाचे चार कर्मचारी निलंबित

By admin | Updated: April 12, 2017 02:17 IST

कर्तव्यात कामचुकारपणा करणाऱ्या मलेरिया विभागातील चार कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्याचा आदेश महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी मंगळवारी दिला.

अकोला: शहरात स्वाइन फ्लू आजाराने उग्र रूप धारण केल्यानंतरही कर्तव्यात कामचुकारपणा करणाऱ्या मलेरिया विभागातील चार कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्याचा आदेश महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी मंगळवारी दिला. शहरात साफसफाईच्या कामात हलगर्जीपणा बाळगणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही अशाच प्रकारच्या कारवाईचा बडगा उगारला जाण्याचे संकेत आहेत. शहरात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वाइन फ्ल्यू आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. शहराच्या विविध भागात घाणीचे, केरकचऱ्याचे ढीग साचले असून, नाल्या-गटारे घाणीने तुडुंब साचली आहेत. असे असले तरी मनपाचा वैद्यकीय आरोग्य विभाग, स्वच्छता विभाग, मलेरिया विभाग कोणत्याही उपाययोजना करीत नसल्याचे चित्र समोर आले. याप्रकाराची महापौर विजय अग्रवाल यांनी गंभीर दखल घेत मागील तीन दिवसांपासून मनपाच्या आरोग्य यंत्रणेच्या कामकाजाचा इत्थंभूत आढावा घेतला. महापौर अग्रवाल यांनी १० एप्रिल रोजी दक्षिण झोनस्थित मनपाच्या संकुलमध्ये मलेरिया विभागाची आकस्मिक पाहणी केली असता ३२ कर्मचाऱ्यांपैकी १६ कर्मचारी गैरहजर आढळून आले होते. तर उर्वरित कर्मचारी उशिरा पोहोचले. तसेच मलेरिया विभागाच्या गोडावूनची पाहणी केली असता उपलब्ध औषधी साठा तसेच साठा पुस्तिकेच्या नोंदवहीत तफावत आढळून आली होती. यासंदर्भात महापौरांनी आयुक्त अजय लहाने यांच्यासोबत चर्चा केली. मलेरिया विभागातील चार कर्मचारी कर्तव्यात कसूर करीत असल्याचे लक्षात येताच आयुक्त लहाने यांनी सदर कर्मचाऱ्यांचे निलंबन करून त्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचे आदेश दिले.शहरावर स्वाइन फ्लूचे सावट लक्षात घेता स्वच्छता व साफसफाईच्या कामात कोणताही हलगर्जीपणा खपवून घेणार नाही. वैद्यकीय आरोग्य यंत्रणा, स्वच्छता विभागासह मलेरिया विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना साफसफाईच्या कामाला लागण्याचे निर्देश दिले आहेत. कर्तव्यात कसूर आढळल्यास कारवाई निश्चित आहे. - अजय लहाने, आयुक्त, मनपा