वान धरणाचे चार वक्रद्वार उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:22 IST2021-08-22T04:22:10+5:302021-08-22T04:22:10+5:30

सातपुडा पर्वताच्या कुशीत वसलेले वान धरण तेल्हारा व लगतच्या बुलडाणा जिल्ह्यातील गावांसाठी वरदान ठरले आहे. गत चार दिवसांपासून सुरू ...

The four curved gates of the Wan Dam opened | वान धरणाचे चार वक्रद्वार उघडले

वान धरणाचे चार वक्रद्वार उघडले

सातपुडा पर्वताच्या कुशीत वसलेले वान धरण तेल्हारा व लगतच्या बुलडाणा जिल्ह्यातील गावांसाठी वरदान ठरले आहे. गत चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वान धरणात पाण्याची मोठी आवक होत आहे. वाढती जलपातळी लक्षात घेता शुक्रवारी धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले होते. पाण्याची आवक सुरूच असल्याने शनिवारी सकाळी आणखी दोन दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. वान प्रकल्पातून नदीपात्रात होत असलेला विसर्ग ५४.३५ घ.मी./से.वरून वाढवून ८५.९१ घ.मी./से. एवढा करण्यात येत आहे. प्रकल्पाची २ वक्रद्वारे प्रत्येकी ५० सेमी उंचीने व २ वक्रद्वारे प्रत्येकी २५ सेमी उंचीने उघडून नदीपात्रात विसर्ग सोडण्यात येत आहे. पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे/कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल. नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सावध राहावे, असा इशारा पाटबंधारे विभागाकडून देण्यात आला आहे.

Web Title: The four curved gates of the Wan Dam opened