आगीवर नियंत्रण मिळवून परत येत असताना वनरक्षकाचा अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:17 IST2021-04-06T04:17:20+5:302021-04-06T04:17:20+5:30
पांढुर्णा बीटमध्ये दररोज आगीच्या घटना वाढत आहेत. शनिवारी रात्री आगीवर नियंत्रण मिळवून सर्व वनरक्षक दुचाकीने परत येत होते. दरम्यान, ...

आगीवर नियंत्रण मिळवून परत येत असताना वनरक्षकाचा अपघात
पांढुर्णा बीटमध्ये दररोज आगीच्या घटना वाढत आहेत. शनिवारी रात्री आगीवर नियंत्रण मिळवून सर्व वनरक्षक दुचाकीने परत येत होते. दरम्यान, शिवाजी आल्हाट हे सर्वात शेवटी निघाले होते. ते दुचाकीने येत असताना झिरो पॉइंटनजीक त्यांच्या दुचाकीसमोर काळविटांचा कळप आल्याने अपघात झाला. या अपघातात शिवाजी आल्हाट गंभीर जखमी झाले. अपघातानंतर तब्बल दोन ते तीन तास जागीच पडून होते. शेतामध्ये राहणाऱ्या मजुरांना आवाज आल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मजुरांना शिवाजी आल्हाट बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यानंतर त्यांनी लगेच शेतातील नागरिकांना जमा करून वनविभागाशी संपर्क साधला. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेत जखमी शिवाजी आल्हाट यांना उपारार्थ भरती केले. त्यांना पुढील उपचारार्थ अकोला येथे पाठविण्यात आल्याची माहिती आहे.