अस्वलाच्या हल्ल्यात वनमजूर ठार, जितापूर बिटमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2024 18:59 IST2024-03-11T18:58:50+5:302024-03-11T18:59:54+5:30
सध्या मेळघाट वन्यजीव विभागात वनमजुरांच्या माध्यमातून उन्हाळापूर्व कामे करण्यात येत आहेत.

अस्वलाच्या हल्ल्यात वनमजूर ठार, जितापूर बिटमधील घटना
अकोला : अकोट तालुक्यातील धोंडाआखर वर्तुळ क्षेत्रातील पूर्व जितापूर बिट परिसरात गस्तीवर असलेल्या वन मजुरावर अस्वलाने हल्ला केल्याची घटना ११ मार्च रोजी सकाळी घडली. या हल्ल्यात मजुराचा मृत्यू झाला.
सध्या मेळघाट वन्यजीव विभागात वनमजुरांच्या माध्यमातून उन्हाळापूर्व कामे करण्यात येत आहेत. वनरक्षक सोंगे, वनमजूर सुरेंद्र सोलकर, वनमजूर रसूल रुस्तम मोरे (५९) हे पूर्व जितापूर बिटमध्ये गस्तीवर होते. दरम्यान, वनमजूर रसूल मोरे यांच्यावर अस्वलाने हल्ला चढविला. तिघांनीही या अस्वलाचा प्रतिकार करीत हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. पण, या हल्ल्यात रसूल मोरे गंभीररीत्या जखमी झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतरही जखमी वनमजुरास आणण्यासाठी वनविभागाचे वाहन जाऊ शकले नाही. त्यामुळे जखमीला दुचाकीने आणले. यामध्ये विलंब झाल्याने वनरक्षकाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अकोट येथे उपजिल्हा रुग्णालयात मृतकाचे नातेवाईक आक्रमक झाल्याचेही पाहण्यास मिळाले.