मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्यांना वन काेठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:21 IST2021-09-11T04:21:02+5:302021-09-11T04:21:02+5:30

अनील बंडू देशमुख असे आरोपीचे नाव असून तो बुलडाणा जिल्ह्यातील माटरगाव येथील रहिवासी आहे. आरोपीला बाळापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात ...

Forehead snakes smugglers | मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्यांना वन काेठडी

मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्यांना वन काेठडी

अनील बंडू देशमुख असे आरोपीचे नाव असून तो बुलडाणा जिल्ह्यातील माटरगाव येथील रहिवासी आहे. आरोपीला बाळापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बाळापूर येथे राष्ट्रीय महामार्ग परिसरात एक व्यक्ती मांडूळ सापाची तस्करी करीत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी गुरुवारी दुपारच्या सुमारास कारवाई करत आरोपी अनिल बंडू देशमुख यास अटक केली. आरोपीकडून पोलिसांनी ३०० ग्रॅम वजनाचा दोन तोंड असलेला मांडूळ जातीचा साप जप्त केला. या सापाची किंमत ५५ लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनात दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली. त्यानंतर शुक्रवारी आराेपीस न्यायालयासमाेर हजर केले असता न्यायालयाने त्याला वन काेठडी सुनावली़

Web Title: Forehead snakes smugglers