विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी अकोल्यातील फुटबॉल प्रेमी पोहोचले कतारमध्ये 

By Atul.jaiswal | Updated: November 25, 2022 12:14 IST2022-11-25T12:14:04+5:302022-11-25T12:14:12+5:30

कतार येथे सुरू असणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील थरारक सामन्  यांचा आनंद लुटण्यासाठी जगभरातील फुटबॉलप्रेमी एकवटले आहेत.

Football lovers from Akola reached Qatar for World Cup football tournament | विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी अकोल्यातील फुटबॉल प्रेमी पोहोचले कतारमध्ये 

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी अकोल्यातील फुटबॉल प्रेमी पोहोचले कतारमध्ये 

अकोला-

कतार येथे सुरू असणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील थरारक सामन्  यांचा आनंद लुटण्यासाठी जगभरातील फुटबॉलप्रेमी एकवटले आहेत. त्यात अकोल्याचे फुटबॉल प्रेमी सुद्धा सहभागी झाले आहेत.

अकोल्यामध्ये फुटबॉल प्रेमी व खेळाडूंची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. फुटबॉल च्या विविध स्पर्धांमध्ये अकोल्याचे फुटबॉल खेळाडू यश मिळवीत असतात. त्यामुळे फुटबॉलची विश्वचषक स्पर्धा व या स्पर्धेतील थरारक क्षण प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी अकोल्यातील फुटबॉल प्रेमी युवराज गावंडे, देवराज सावंत, मंदार देशपांडे, किशोर पाटील, अक्षय देशमुख हे थेट कतारमध्ये पोहोचले आहेत. अकोल्यातील या फुटबॉल प्रेमींनी कतार येथील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या खचाखच भरलेल्या स्टेडियम मध्ये हजेरी लावून या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी बनविण्यात आलेल्या विशेष प्रतिकृती सोबत आपले छायाचित्र काढून सोशल मीडियावर पाठविले आहे. त्यामुळे कतार येथे सुरू असलेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अकोल्यातील फुटबॉल प्रेमींनी हजेरी लावून अकोल्याचे फुटबॉल प्रेम कतार पर्यंत पोहोचविल्याने युवराज गावंडे, देवराज सावंत, मंदार देशपांडे, किशोर पाटील, अक्षय देशमुख यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Web Title: Football lovers from Akola reached Qatar for World Cup football tournament