शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

बाबासाहेंबाचे कार्य पूढे नेण्यासाठी अनुयायांनी निष्ठा जपली पाहिजे- तुकाराम डोंगरे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 1:41 PM

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत काम करणारे हातरू न येथील ९२ वर्षिय तुकाराम डोंगरे यांच्याशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त साधलेला संवाद..

अकोला: आंबेडकरी चळवळ ही स्वाभीमानाची चळवळ आहे.डॉ. बाबासाहेब आंबेकडरांनी आम्हाला स्वाभीमान, आत्मसन्मानाने जगण्याचा संदेश दिला. बहुजन समाजासाठी तसेच देशासाठी त्यांनी केलेले काम लाखमोलाचे आहे. बाबासाहेंबाचे कार्य पूढे नेण्यासाठी आज खरी गरज आहे निष्ठेची... डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत काम करणारे हातरू न येथील ९२ वर्षिय तुकाराम डोंगरे यांच्याशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त साधलेला संवाद..डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसोबत तुमचा संपर्क कधी आला?डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकोला येथे येऊन गेले. येथे त्यांची विशाल सभा झाली. मुबंई येथे बाबासाहेबांची सभा प्रत्यक्ष बघितली. बाबासाहेबांची सभा एकूण आम्हाला कार्य करण्याची दिशा मिळाली. स्फुलींग चेतले.तेव्हापासूनच शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन,आंबेडकरी चळवळीत एकनिष्ठेने काम केले.सभा,मिरवणूक,समाजाच्या विविध लढ्यात सहभाग घेतला. जिल्ह्यातही ही चळवळ जोरात सुरू झाली.गावोगाव फिरू न आंबेडकरी,बहुजन समाजाला जागृत करण्याचे काम आंबेडकरी चळवळींच्या नेत्यासोबत केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तुमची भेट झाली का ?डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीत निष्ठेने काम करणे, समाजजागृती करणे हे आमचे ध्येय होते. शेड्यूल्ड कास्ट फेडरेशशनच्या काळापासू आम्ही चळवळीत झोकून दिले होते.याच दरम्यान,बाबासाहेबांना जवळून बघण्याची संधी प्राप्त झाली. बाबासाहेब प्रत्येक कार्यकर्त्यांचा सन्मान करायचे.

तुमच्या स्मरणातील घटना कोणती?माझ्या स्मरणात राहणारा मुद्दा म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली ‘प्रबुध्द भारत’च्या वर्गणीच्या पोचपावतीची आहे. तसेच महापरिनिर्वाणानंतर सन १९६४ मध्ये चैत्यभूमीवर बाबासाहेबांच्या स्मारकासाठी देशभरातून आर्थिक मदतीचा ओघ सुरू झाला होता.त्यावेळी मीदेखील हातरू न येथून ९ रू पयांची मनीआॅडर पाठविली होती.ही मनीआॅडर ७ मे १९६४ रोजी भारतीय बौध्द महासभेच्यावतीने भैय्यासाहेब उपाख्य यशवंतराव आंबेडकर यांनी स्विकारली होती.त्यांच्या स्वाक्षरीची पोचपावती आणि मनीआॅडरची प्रत जपून ठेवली आहे.

बाबासाहेबांनी दिलेली ‘प्रबुध्द भारत’ची पोच पावती अनमोल ठेवा आहे.ट्रायने लागू बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या शेडयूल्ड कास्ट फेडरेशनच्या काळापासून चळवळीत एकनिष्ठेने काम करीत असताना,एक जिद्द होती.त्या काळात बाबासाहेबांनी सुरू केलेल्या चळवळीला वाहिलेल्या ‘ प्रबुध्द भारत’ चा मी वार्षिक वर्गणीदार होतो.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच मला ‘प्रबुध्द भारत’ ची सभासद वर्गणीची पोच पावती मला दिली होती.हा अनमोल ठेवा मी जपून ठेवला आहे.‘ प्रबुध्द भारत’ चे तेव्हाचे अंकही जपून ठेवले आहेत. ते वाचले पुन्हा,पुन्हा बाबासाहेब असतानाचा काळ डोळ्यासमोर उभा राहतो.तसेच दादासाहेब गायकवाड यांची भूमिहिनाची चळवळ, व येरवडा जेल आठवतो.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करायचे असेल,प्रत्येकाने चळवळीला योगदान दिले पाहिजे.‘ चळवळीचे ‘ प्रबुध्द भारत’ हे प्रत्येकाने हमखास घेणे क्रमप्राप्त आहे.कारण चळवळ जिवंत असली तरच आपण सलामत आहोत. म्हणूनच आता सर्वांनी सहभाग घ्यावा..डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत हिरारीने भाग घेण्याची जिल्ह्याची परंपरा आहे. त्याकाळात आम्ही तहान,भूक हरवून काम करायचो.

 - तुकाराम डोंगरे

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरinterviewमुलाखत