शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
6
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
7
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
8
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
9
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
10
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
11
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
12
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
13
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
14
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
15
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
16
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
17
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
18
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
19
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
20
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मूलभूत सुविधांच्या कामांचा मार्ग मोकळा

By admin | Updated: March 6, 2015 01:41 IST

निधी खर्च करण्यास मुदतवाढ; लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या कामांचा समावेश.

अकोला: लोकप्रतिनिधींनी सन २0१३-१४ या वर्षात सुचविलेल्या ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांच्या कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला निधी खर्च करण्यास ३१ मार्च २0१५ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचा निर्णय मंगळवार, ३ मार्च रोजी शासनामार्फत घेण्यात आला. त्यामुळे निधीअभावी रखडलेल्या राज्यातील जनसुविधांच्या कामांचा मार्ग आता मोकळा झाला आहे.सन २0१३-१४ या वर्षासाठी लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील रस्ते, गटारे व इतर मूलभूत सुविधांच्या कामांसाठी मंजूर करण्यात आलेल्या विशेष निधीमधून जिल्हानिहाय कामे मंजूर करण्यात आली आहेत. तसेच या कामांसाठी मंजूर रकमेच्या ८0 टक्के निधी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्यातील अधीक्षक अभियंत्यांना वितरित करण्यास गत ४ मार्च २0१४ च्या शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आली होती. वितरित करण्यात आलेला निधी गत ३0 सप्टेंबरपर्यंत खर्च करण्याची कालर्मयादा ठरवून देण्यात आली होती. तथापि मंजूर कामांपैकी काही कामे ठरवून देण्यात आलेल्या कालर्मयादेत पूर्ण झाली नसल्याने, या विकासकामांची देयके अदा करण्यास अडचणी निर्माण झाल्याने मूलभूत सुविधांची कामे वांध्यात सापडली होती. त्यामध्ये पश्‍चिम वर्‍हाडातील अकोला, वाशिम व बुलडाणा या तीन जिल्ह्यातील १00 कामे रखडली. तसेच गत ३0 सप्टेंबर २0१४ नंतर पूर्ण झालेल्या कामांची देयके अदा करण्यास अडचणी येत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या रस्ते, गटारे व अन्य मूलभूत सुविधांच्या कामांसाठी मंजूर करण्यात आलेला निधी ३१ मार्च २0१५ पर्यंत खर्च करण्यास मुदतवाढ देण्यात येत असल्याचा निर्णय ३ मार्च रोजी शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागामार्फत घेण्यात आला. त्यामुळे निधीअभावी रखडलेल्या मूलभूत सुविधांच्या कामांचा मार्ग मोकळा झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, अकोलाचे कार्यकारी अभियंता एस.एस. भगत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या मूलभूत सुविधांच्या कामांसाठी निधी खर्च करण्यास शासनामार्फत मुदतवाढ देण्यात आल्याने, रखडलेली मूलभूत सुविधांची कामे मार्गी लागणार असल्याचे सांगीतले. व-हाडात रखडलेली कामे! जिल्हा                 कामे अकोला               ३२ वाशिम                ६४ बुलडाणा              0४ ................... एकूण                  १00