युवतीचे प्रियकरासोबत पलायन
By Admin | Updated: June 16, 2017 00:39 IST2017-06-16T00:39:35+5:302017-06-16T00:39:35+5:30
अकोला: शहरातील एका युवतीने प्रियकरासोबत पलायन केले. सिव्हिल लाइन पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेऊन युवतीचा शोध घेतला आणि तिला पालकांच्या स्वाधीन केले. ही घटना गुरुवारी समोर आली.

युवतीचे प्रियकरासोबत पलायन
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: शहरातील एका युवतीने प्रियकरासोबत पलायन केले. सिव्हिल लाइन पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेऊन युवतीचा शोध घेतला आणि तिला पालकांच्या स्वाधीन केले. ही घटना गुरुवारी समोर आली.
शहरातील एका युवतीचे एका युवकासोबत प्रेमसंब्ांध जुळले. त्यांच्या प्रेमाला बहार आली. दररोज भेटी-गाठी होऊ लागल्या. कुटुंबीयांना युवतीच्या प्रेमाची जराही कल्पना नव्हती. युवकाच्या प्रेमात आकंठ बुडालेली युवती गोंधळून गेली होती. सोबत जगण्या-मरणाच्या आणाभाका घेतलेल्या प्रेयसीने प्रियकरासोबत जाण्याचे मनात निश्चित केले. युवती अचानक घरातून गायब झाली. युवती घरी परतली नसल्यामुळे कुटुंबीयांनी सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
पोलिसांनी तक्रारीनुसार युवतीचा शोध घेतला आणि तिला प्रियकरासोबत पोलीस ठाण्यात आणले. यावेळी युवतीची समजूत काढण्यात आली आणि तिला तिच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. यावेळी तिच्या प्रियकराचीही समजूत काढण्यात आली.