खंडेलवाल टाॅवर येथे ध्वजाराेहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:20 IST2021-02-05T06:20:59+5:302021-02-05T06:20:59+5:30
हुतात्मा स्मारक येथे ध्वजाराेहण अकाेला : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त स्थानिक हुतात्मा स्मारक येथे ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी विलास मुंजे ...

खंडेलवाल टाॅवर येथे ध्वजाराेहण
हुतात्मा स्मारक येथे ध्वजाराेहण
अकाेला : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त स्थानिक हुतात्मा स्मारक येथे ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी विलास मुंजे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी माजी महापौर सुमनताई गावंडे, क्षेत्रीय अधिकारी देविदास निकाळजे, अतिक्रमण विभागाचे प्रवीण मिश्रा, राजू सरप, मुकुंद घाडगे, गौतम कांबळे तसेच मनपा अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
मनपात महापाैरांच्या हस्ते ध्वजाराेहण
अकाेला : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेत महापौर अर्चना मसने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी स्थायी समिती सभापती सतीश ढगे, महिला व बालकल्याण समिती सभापती मनिषा भंसाली, ज्येष्ठ नगरसेवक हरिशभाई आलिमचंदाणी, अब्दुल रहीम पेंटर, माजी नगरसेवक जयंत मसने, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र भंसाली आदी उपस्थित होते.
स्वच्छ सर्वेक्षणसाठी मनपा कामाला
अकाेला: ‘स्वच्छ सर्वेक्षण - २०२१’च्या अनुषंगाने शहरात जनजागृती करण्याच्या उद्देशातून ‘माझी वसुंधरा अभियान’ पथनाट्य रथ आणि डिजिटल व्हॅनला महापाैर अर्चना मसने यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी उपायुक्त पूनम कळंबे, नगरसचिव अनिल बिडवे, क्षेत्रीय अधिकारी विठ्ठल देवकते, दिलीप जाधव, राजेंद्र टापरे, देविदास निकाळजे, प्रशांत राजुरकर, कर अधीक्षक विजय पारतवार उपस्थित होते.
लसीकरणाला घाबरू नका!
अकाेला : काेराेना आजारावर मात करण्यासाठी शासनाने लसीकरण माेहीम सुरु केली आहे. पहिल्या टप्प्यात वैद्यकीय, आराेग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना लस दिली जात असून, ती पूर्णत: सुरक्षित आहे. या लसीबद्दल नाहक गैरसमज व अफवा पसरवल्या जात असून, भारतीय लस सुरक्षित आहे. त्यामुळे नागरिकांनी लसीकरणाला न घाबरण्याचे आवाहन महापाैर अर्चना मसने यांनी केले आहे.
‘भूमिगत मार्गाला बॅरिकेट्स लावा!’
अकाेला : गांधी राेड भागातून भूमिगत मार्गाचे बांधकाम केले जात आहे. गांधी राेडकडून धिंग्रा चाैकाकडे येणाऱ्या वाहनचालकांसाठी हा मार्ग धाेक्याचा ठरू लागला असून, या मार्गाला बॅरिकेट्स लावण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. बॅरिकेट्स नसल्यामुळे भूमिगत रस्त्यात वाहने काेसळून अपघात हाेण्याची शक्यता बळावली असल्याने स्थानिक रहिवाशांनी मनपाकडे निवेदन दिले आहे.
प्रभाग क्रमांक १मध्ये पाणीटंचाई
अकाेला : प्रभाग क्रमांक १ अंतर्गत येणाऱ्या नायगाव ते वाकापूर रस्त्यावरील भागात मनपाची नळयाेजना नसल्यामुळे स्थानिक रहिवाशांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. परिसरातील हातपंप, सबमर्सिबल पंपांवर महिला व लहान मुले पाण्यासाठी गर्दी करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
; ! ? () -