ग्रामपंचायतीवर ग्रामविकास परिवर्तन पॅनलचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:17 IST2021-02-15T04:17:36+5:302021-02-15T04:17:36+5:30

१५ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे १३ उमेदवार विजयी झाले, ग्रामविकास पॅनलचे २ उमेदवार निवडून आले. ...

Flag of Gram Vikas Parivartan Panel on Gram Panchayat | ग्रामपंचायतीवर ग्रामविकास परिवर्तन पॅनलचा झेंडा

ग्रामपंचायतीवर ग्रामविकास परिवर्तन पॅनलचा झेंडा

१५ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे १३ उमेदवार विजयी झाले, ग्रामविकास पॅनलचे २ उमेदवार निवडून आले. ग्रामविकास परिवर्तन पॅनलने विजयश्री खेचत ग्रामपंचायतीवर झेंडा फडकावला. नवनिर्वाचित सरपंच अतुल वाठ व नवनिर्वाचित उपसरपंच इम्रान खान यांचे ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे मार्गदर्शक वंचित बहुजन आघाडीचे माजी पं.स. सदस्य मोहन रोकडे, जिल्हा भाजपचे ग्रामीण उपाध्यक्ष बाबूभाऊ देशमुख, भारतीय किसान संघ विदर्भ प्रांत युवा प्रमुख राहुल राठी, भाजप कुरूम सर्कल प्रमुख संतोष शिरभाते यांनी स्वागत केले. यावेळी निवडणूक अध्यासी अधिकारी म्हणून सदानंद देशपांडे, अधिकारी दीपक मुनेश्वर, तलाठी विशाल काटोले यांनी काम पाहिले. (वा.प्र.)

फोटो: ८ बाय १०

Web Title: Flag of Gram Vikas Parivartan Panel on Gram Panchayat