शौचालयाच्या टाक्यात पडून पाच वर्षीय बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 20:08 IST2017-12-25T20:04:13+5:302017-12-25T20:08:15+5:30

तेल्हारा : तेल्हारा तालुक्यातील माळेगाव बाजार येथे महावितरण कंपनीच्यावतीने सुरू असलेल्या बांधकामावरील शेतमजुराच्या पाच वर्षीय मुलाचा शौचालयाच्या टाक्यात पडून मृत्यू झाल्याची घटना २५ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता घडली.

Five year old child dies in toilets | शौचालयाच्या टाक्यात पडून पाच वर्षीय बालकाचा मृत्यू

शौचालयाच्या टाक्यात पडून पाच वर्षीय बालकाचा मृत्यू

ठळक मुद्देतेल्हारा तालुक्यातील माळेगाव बाजार येथील घटना.खेळत असताना बालक टाक्यात पडला.

तेल्हारा : तेल्हारा तालुक्यातील माळेगाव बाजार येथे महावितरण कंपनीच्यावतीने सुरू असलेल्या बांधकामावरील शेतमजुराच्या पाच वर्षीय मुलाचा शौचालयाच्या टाक्यात पडून मृत्यू झाल्याची घटना २५ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता घडली.
माळेगाव बाजार येथे महावितरणच्या उपकेंद्राचे बांधकाम सुरू आहे. या कामावर बुलडाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील आंधृड येथील समाधान भालेराव हे सहकुटुंब मजुरीसाठी आले आहेत. या ठिकाणी समाधान भालेराव व त्यांची पत्नी २५ डिसेंबर रोजी काम करीत असताना दुपारी ३.३० वाजता त्यांचा कार्तिक भालेराव नावाचा पाच वर्षीय मुलगा बाजूला खेळत होता. यावेळी खेळत असताना शौचालयाच्या टाक्यात पडला. हा प्रकार तेथील मजुरांच्या लक्षात येताच कार्तिकला तेल्हारा येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. तापडिया यांनी त्याला मृत घोषित केले. याबाबतची फिर्याद तेल्हारा पोलिसांत देण्यात आली असून, पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Five year old child dies in toilets