शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
4
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
5
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
6
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
7
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
8
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
9
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
10
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
11
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
12
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
13
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
14
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
15
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
20
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी पतीस पाच वर्षांचा कारावास

By admin | Updated: February 28, 2015 02:07 IST

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली शिक्षा.

अकोला: पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शुक्रवारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जी. देशपांडे यांच्या न्यायालयाने पतीस पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. खामगाव तालुक्यातील घारोड येथील मोतीलाल इंगोले यांची मुलगी शारदा हिचा विवाह २00६ मध्ये सस्ती येथील विशाल अंभोरे याच्यासोबत झाला होता. त्यांना तीन मुले आहेत. लग्न झाल्यानंतर पती विशाल अंभोरे, सासू इंदूबाई अंभोरे, चुलत सासरा मोतीराम अंभोरे, अजाबराव अंभोरे हे माहेराहून पैसे ंआणण्यासाठी शारदाचा शारीरिक व मानसिक छळ करीत होते. १३ जानेवारी २0११ रोजी शारदा ही घरातून अचानक बेपत्ता झाली आणि तिने घराजवळील विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. विहिरीजवळ विषारी औषधसुद्धा मिळून आले. मोतीलाल इंगोले यांच्या तक्रारीनुसार चान्नी पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि कलम ४९८ (अ), ३0६, ३0४ (ब) नुसार गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचा तपास करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जी. देशपांडे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने आठ साक्षीदार तपासले. शारदाच्या आई-वडिलांची साक्ष व इतर पुराव्यांच्या आधारे आरोपी विशाल अंभोरेला भादंवि कलम ४९८ (अ) मध्ये २ वर्ष कारावास, २ हजार रुपये दंड आणि कलम ३0६ नुसार पाच वर्षांचा कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. इतर आरोपींची मात्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. सरकारतर्फे साहाय्यक सरकारी अभियोक्ता प्रवीण चिंचोले यांनी तर आरोपीतर्फे अँड. प्रवीण तायडे यांनी बाजू मांडली.