पाच हजारावर विद्यार्थी देणार नवोदयची प्रवेश परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 12:24 PM2019-03-20T12:24:56+5:302019-03-20T12:25:01+5:30

अकोला: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई)च्यावतीने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला चालना देण्यासाठी जवाहर नवोदय विद्यालयातील प्रवेशासाठी परीक्षा घेण्यात येते.

Five thousand students are going to Navodaya's entrance examination | पाच हजारावर विद्यार्थी देणार नवोदयची प्रवेश परीक्षा

पाच हजारावर विद्यार्थी देणार नवोदयची प्रवेश परीक्षा

Next

अकोला: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई)च्यावतीने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला चालना देण्यासाठी जवाहर नवोदय विद्यालयातील प्रवेशासाठी परीक्षा घेण्यात येते. जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयाच्या सत्र २0१९-२0 च्या इयत्ता सहावीमध्ये प्रवेशासाठी ६ एप्रिल रोजी परीक्षा होणार आहे. या परीक्षेला जिल्ह्यातून पाच हजारावर विद्यार्थी बसणार आहेत, अशी माहिती जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्राचार्य सुमन बैलमारे यांनी दिली.
इयत्ता सहावी वर्गाच्या प्रवेशासाठी जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांवर नवोदयची परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेसाठी आॅनलाइन अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे. अकोला जिल्ह्यातील बाभुळगाव येथील जवाहर नवोदय विद्यालयामध्ये इयत्ता सहावीच्या ८0 जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. २८ राज्यांमधील ६३0 जागांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि आरक्षणाच्या आधारावर जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी निवड केली जाणार आहे. ही परीक्षा नि:शुल्क घेण्यात येते. केंद्र शासनांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध होत आहे. (प्रतिनिधी)

 

Web Title: Five thousand students are going to Navodaya's entrance examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.