अकाेला जिल्ह्यातील पाच शाळा हाेणार आदर्श!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 11:08 AM2020-10-28T11:08:19+5:302020-10-28T11:10:53+5:30

School, Akola News आकर्षक इमारत, क्रीडांगण, क्रीडा साहित्य, आयसीटी बॅग, सायन्स लॅब, ग्रंथालय, उत्तम शैक्षणिक पाेषक वातावरण राहणार आहे.

Five schools in Akala district will be ideal! | अकाेला जिल्ह्यातील पाच शाळा हाेणार आदर्श!

अकाेला जिल्ह्यातील पाच शाळा हाेणार आदर्श!

googlenewsNext
ठळक मुद्देपाठ्यपुस्तकांच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना शिकवणार आहेत. शाळेतील शिक्षकांना ५ वर्षे कार्यरत राहवे लागणार आहे.

अकाेला : राज्य शासनाच्यावतीने जिल्हा परिषदेच्या शाळा आदर्श करण्यासंदर्भात साेमवारी आदेश देण्यात आला असून, त्यामध्ये अकाेल्यातील पाच शाळांचा समावेश आहे. या पाच शाळांच्या यादीला अंतिम स्वरूप देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना १५ दिवसात सूचित करण्याबाबत कळविण्यात आले आहे. अकाेट तालुक्यातील चाेहाेट्टा येथील उर्दू प्राथमिक शाळा, बार्शीटाकळी तालुक्यातील पुनाेती बु., मूर्तिजापूर तालुक्यातील अनभाेरा, पातूर तालुक्यातील शेकापूर येथील वरिष्ठ जि. प. शाळा, तेल्हारा तालुक्यातील अडसूल येथील शाळांचा समावेश आहे.

आदर्श शाळा निर्मितीमध्ये शाैचालय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आकर्षक इमारत, क्रीडांगण, क्रीडा साहित्य, आयसीटी बॅग, सायन्स लॅब, ग्रंथालय, उत्तम शैक्षणिक पाेषक वातावरण राहणार आहे. पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना शिकवणार आहेत. विविध शैक्षणिक कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. येथील शाळेतील शिक्षकांना ५ वर्षे कार्यरत राहवे लागणार आहे. शिक्षकाची तेथून विनंतीवरून बदली हाेणार नाही.

 

दर शनिवारी दप्तर नाही

आदर्श शाळेतील विद्यार्थ्यांना ताण विरहित वातावरण मिळावयास हवे हाेते. पाठ्यपुस्तक व दप्तरातील साहित्याच्या पलिकडे जावून त्यांना शाळेत, शाळा परिसरातील उपलब्ध साधन सामग्रीमधूनही विविध विषयातील ज्ञान अवगत करता, यासाठी प्रत्येक शनिवारी ‘दप्तरमुक्त शाळा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

.

Web Title: Five schools in Akala district will be ideal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.