शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

अकोला जिल्हय़ात वेगवेगळय़ा ठिकाणी झालेल्या चार अपघातात पाच जण ठार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 2:34 AM

लोकमत न्यूज नेटवर्कपातूर/दिग्रस बु.  : पातूर तालुक्यात दोन वेगवेगळ्य़ा अपघातात तीन जण तर उरळ येथे बस खाली आल्याने विद्यार्थी तर मळसूर येथे झालेल्या अपघातात युवक ठार झाला.  शुक्रवारी घडलेल्या या चार अपघातांमुळे पाच जणांना जीव गमवावा लागला आहे. चान्नी फाट्यावर दुचाकी घसरल्याने दोघांचा मृत्यू झाला, तर शिर्ला फाट्याजवळ प्रवासी वाहनाने दुचाकीस ...

ठळक मुद्देचान्नी फाट्यावर अज्ञात वाहनाची तर शिर्ला फाट्यावर प्रवासी वाहनाची दुचाकीस धडकमळसूर-विवरा मार्गावरील अपघातात दुचाकीस्वार ठारमळसूर-विवरा मार्गावरील अपघातात दुचाकीस्वार ठार

लोकमत न्यूज नेटवर्कपातूर/दिग्रस बु.  : पातूर तालुक्यात दोन वेगवेगळ्य़ा अपघातात तीन जण तर उरळ येथे बस खाली आल्याने विद्यार्थी तर मळसूर येथे झालेल्या अपघातात युवक ठार झाला.  शुक्रवारी घडलेल्या या चार अपघातांमुळे पाच जणांना जीव गमवावा लागला आहे. चान्नी फाट्यावर दुचाकी घसरल्याने दोघांचा मृत्यू झाला, तर शिर्ला फाट्याजवळ प्रवासी वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने एक जण ठार झाला. पातूर तालुक्यातील दिग्रस बु. येथे सोपीनाथ महाराज यात्रेनिमित्त परिसरात व रस्त्यावर मोठी गर्दी आहे. पातूर येथील देवीदास सुरवाडे (४८) आणि सुनील गवई (४५) हे २ फेब्रुवारीला त्यांच्या सीजी 0७ - ७७२२ क्रमांकाच्या बुलेट दुचाकीने वाडेगाव येथून पातूरकडे जात होते. चान्नी फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीस अज्ञात वाहनाने जबर धडक दिली.  यामध्ये देवीदास सुरवाडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. सुनील गवई यांना उपचारासाठी अकोला येथील सवरेपचार रुग्णालयात नेत असताना वाटेत त्यांचा मृत्यू झाला. वाडेगाव पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक नीलेश देशमुख यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठविला. पातूरवरून अकोलाकडे जात असलेल्या प्रवासी वाहन क्र.एमएच ३७-६९७४ ने शिर्ला फाट्याजवळ समोरून येत असलेल्या दुचाकी क्र.एमएच ३0 एडी ९८३७ ला जबर धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की दुचाकीचा चुराडा झाला व दुचाकी चालक म. शयबाज म. ऐजाज सौदागर रा. मुजावरपुरा हा गंभीर जखमी झाला होता. त्याला अकोल्यातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त दोन्ही वाहने पातूर पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आली आहेत. 

अवैध प्रवासी वाहतुकीचा बळी पातूर शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मोठय़ा प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक होत आहे. पातूर शहरातून बाळापूर, अकोला, पांगराबंदी, माळ राजुरा, आलेगाव या मार्गावर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक होत आहे. याकडे ठाणेदारांनी लक्ष देण्याची गरज आहे. या अवैध प्रवासी वाहतुकीने युवकाचा बळी घेतला आहे. 

उरळ येथे बसखाली सापडल्याने विद्यार्थी ठारलोकमत न्यूज नेटवर्कउरळ : बसखाली सापडल्याने शालेय विद्यार्थी ठार झाल्याची घटना उरळ येथील बसस्थानकावर २ फे ब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता घडली. उरळ येथील शिवशंकर विद्यालयात इयत्ता सहावीमध्ये शिकत असलेला ओम प्रभाकर इंगळे (१२) रा. मोरगाव भाकरे हा शाळा सुटल्यानंतर बस पकडण्यासाठी बसस्थानकावर आला होता. सायंकाळी बाजारातील लोकांची व विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती. दरम्यान, बसमध्ये चढण्याच्या प्रयत्नात ओम इंगळे हा बसच्या मागच्या चाकाखाली सापडला. चालकाने बस सुरू केल्याने ओमच्या अंगावरून मागचे चाक जाऊन तो गंभीर जखमी झाला. घटनास्थळावर उपस्थित ग्रामस्थ व पोलिसांनी गंभीर जखमी बालकाला खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथून त्याला अकोला येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच जमादार रामकृष्ण ढोकणे, किशोर पाटील, दादाराव लिखार, संजय वानखडे, नेरकर, प्रवीण मोरे आदींनी घटनास्थळावर धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. 

मळसूर-विवरा मार्गावरील अपघातात दुचाकीस्वार ठारलोकमत न्यूज नेटवर्कमळसूर : मळसूर-विवरा रस्त्यावर २ फेब्रुवारीच्या रात्री ७.३0 वाजता मोटारसायकल अचानक घसरून झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वाराचा गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच मृत्यू झाला.मळसूर येथील दीपक सखाराम गडदे (३५) हा युवक शुक्रवारी रात्री ७.३0 वाजताच्या सुमारास मोटारसायकलने विवराकडून मळसूरकडे येत असताना त्याचे मोटारसायकलवरील नियंत्रण सुटून मोटारसायकल रस्त्यावर आदळली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दीपक गडदेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हे वृत्त लिहिपर्यंत या घटनास्थळी पोलीस पोहोचले नव्हते. 

टॅग्स :AccidentअपघातAkola Ruralअकोला ग्रामीणDeathमृत्यू