बियाणे बाजारात आतापर्यंत पाच टक्केच खरेदी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 14:31 IST2018-06-09T14:31:20+5:302018-06-09T14:31:20+5:30

अकोला : यावर्षी दमदार मान्सूनचे भाकीत वर्तविण्यात आले असून, या आठवड्यात मान्सूनपूर्व पाऊसही जोरात झाला; पण अद्याप शेतकºयांनी अपेक्षेनुसार बियाणे खरेदी सुरू केली नाही. शनिवारी बियाणे बाजाराचा आढावा घेतला असता आतापर्यंत किरकोळ बियाण्यांची विक्री केवळ पाच टक्केच झाल्याचे समोर आले.

five percent of the seed market is bought | बियाणे बाजारात आतापर्यंत पाच टक्केच खरेदी!

बियाणे बाजारात आतापर्यंत पाच टक्केच खरेदी!

ठळक मुद्देयावर्षी शेतकरी पहिला दमदार १०० मि.मी. पाऊस पडल्यावरच बियाणे खरेदीला सुरुवात करतील, असा अंदाज तज्ज्ञ वर्तवित आहेत.काही प्रमाणात सधन शेतकºयांनी बियाणे खरेदी केली. अल्पभूधारक शेतकºयांनी मात्र बाजाराकडे पाठ फिरविली आहे.

अकोला : यावर्षी दमदार मान्सूनचे भाकीत वर्तविण्यात आले असून, या आठवड्यात मान्सूनपूर्व पाऊसही जोरात झाला; पण अद्याप शेतकºयांनी अपेक्षेनुसार बियाणे खरेदी सुरू केली नाही. शनिवारी बियाणे बाजाराचा आढावा घेतला असता आतापर्यंत किरकोळ बियाण्यांची विक्री केवळ पाच टक्केच झाल्याचे समोर आले. याअगोदर बियाणे खरेदीला इतका उशीर कधीच झाला नसल्याचे बियाणे कंपन्या वर्तुळातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शेतकºयांच्या हातात पैसा नाही, हे यामागील एक कारण असले, तरी मान्सूनचे चित्र स्पष्ट झाल्याशिवाय शेतकरी पेरणीसाठीची तिफण बाहेर काढणार नसल्याचे कृषी तज्ज्ञही शक्यता वर्तवित आहेत, असे चित्र संपूर्ण राज्यासह विदर्भातील आहे.
यावर्षी मान्सूनचे अनुकूल भाकीत बघता खासगी कंपन्यांसह महाबीजने बाजारात बियाणे आणले; पण मागच्या वर्षीचा अनुभव बघता शेतकरी सध्याच बियाणे खरेदी करायला तयार नाहीत. मागच्या वर्षी शेतकºयांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. मूग, उडिदाचे पीक हातचे गेले. सोयाबीनचे उत्पादन प्रचंड घटले. विषम हवामानामुळे कापसावर बोंडअळीने आक्रमण केल्याने शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे यावर्षी शेतकरी पहिला दमदार १०० मि.मी. पाऊस पडल्यावरच बियाणे खरेदीला सुरुवात करतील, असा अंदाज तज्ज्ञ वर्तवित आहेत.
विदर्भातील ४९ लाख हेक्टरपैकी खरिपाचे सर्वात जास्त ३२ लाख हेक्टरच्यावर क्षेत्र पश्चिम विदर्भात आहे. पश्चिम विदर्भात अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती हे पाच जिल्हे येतात. या पाच जिल्ह्यांत अकोल्याची बियाणे बाजारपेठ मोठी असून, अनेक प्रकारच्या बियाणे खरेदीसाठी येथे शेतकरी येतात. येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे व महाराष्टÑ राज्य बियाणे महमंडळाचे (महाबीज) मुख्यालय आहे. कृषी विद्यापीठाचे व महाबीजचे बियाणे शेतकरी खरेदी करतात; पण यावर्षी अनुदानावरील बीजोत्पादनासाठीच्या परमिटवरील बियाणे काही प्रमाणात शेतकºयांनी खरेदी केले. बीजोत्पादनासाठीच्या बियाण्यांची मर्यादा एक एकर असून, सोयाबीनची ३० किलोची गोणी १,३५० रुपयांना आहे. काही प्रमाणात सधन शेतकºयांनी बियाणे खरेदी केली. अल्पभूधारक शेतकºयांनी मात्र बाजाराकडे पाठ फिरविली आहे. आतापर्यंत केवळ पाच टक्के किरकोळ बियाणे विक्री झाली.
- किरकोळ बियाणे विक्री आतापर्यंत केवळ पाच टक्के झाली, असे चित्र यापूर्वी कधी बघितले नाही. यापूर्वी जून रोजी ८ तारखेपर्यंत बियाणे संपून जात होते. आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
दिनेशभाई शाह,
कृषी निविष्ठा अभ्यासक,
अकोला.

 

Web Title: five percent of the seed market is bought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.