शिळय़ा अन्नातून पाच जणांना विषबाधा
By Admin | Updated: August 15, 2014 01:24 IST2014-08-15T01:09:42+5:302014-08-15T01:24:17+5:30
अकोला जिल्ह्यातील सांगळूद येथील घटना, पाचही जणांची प्रकृती धोक्याबाहेर.

शिळय़ा अन्नातून पाच जणांना विषबाधा
अकोला - सांगळूद येथे तेरवीच्या कार्यक्रमातील शिळे अन्न बुधवारी रात्री उशिरा खाल्लय़ामुळे पाच जणांना विषबाधा झाल्याची घटना गुरुवारी पहाटे समोर आली. या पाचही जणांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सवरेपचार रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून, पाचही जणांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
सांगळूद येथील रहिवासी गजानन मोरे यांच्या वडिलांचा मृत्यू झाला असून, त्यांच्या तेरवीचा कार्यक्रम बुधवारी १३ ऑगस्ट रोजी होता.
बुधवारी दुपारी कार्यक्रम आटोपल्यानंतर या कार्यक्रमातील शिळे अन्न काही नागरिकांनी रात्री उशिरा सेवन केले. यामध्ये पाच जणांचा समावेश असून, रवी शांताराम खरबडकार (३१), गोविंदा प्र. वडतकार (३५), गौरव भालतिलक (१६), अनिरुद्ध सावरकर (१४) व श्याम सावरकर यांना या शिळय़ा अन्नातून विषबाधा झाली. गुरुवारी पहाटे पाचही जणांना अचानक उलट्या व चक्कर सुरू झाल्याने गावातील नागरिकांनी त्यांना तातडीने सवरेपचार रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल केले.
रुग्णालय प्रशासनाकडून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले असून, दुपारपर्यंत पाचही जणांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
पाचही जणांवर योग्य ते उपचार करण्यात यावे, या मागणीसाठी सांगळूद येथील रहिवासी तसेच छावाचे रणजित पाटील काळे यांच्यासह नागरिकांनी भेट दिली. शिळय़ा अन्नातून विषबाधा होण्याचे प्रकार दिवसें-दिवस वाढत असून, नागरिकांनी शिळे अन्न खाण्याचे टाळावे, असे आवाहन आरोग्य अधिकार्यांनी केले आहे.