पाच अभियंत्यांची खाते चौकशी
By Admin | Updated: August 19, 2014 00:54 IST2014-08-19T00:54:54+5:302014-08-19T00:54:54+5:30
शेगाव विकास आराखडा कामात गैरव्यवहार

पाच अभियंत्यांची खाते चौकशी
अकोला : शेगाव तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत कामातील गैरव्यवहारप्रकरणी अनियमितता आणि निकृष्ट दर्जाच्या कामांसंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तत्कालीन अधीक्षक अभियंत्यांसह संबंधित पाच अभियंत्यांची खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस रामेश्वर पवळ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. शेगाव विकास आराखड्यातील कामाच्या गैरव्यवहार संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांसह संबंधित मंत्री व अधिकार्यांकडे तक्रार केली होती, त्याची दखल घेत संबंधित पाच अभियंत्यांची खातेनिहाय चौकशी सुरू झाली आहे. गैरव्यवहार करणार्या अधिकार्यांना सेवेतून बडतर्फीसह गैरव्यवहाराची रक्कम व्याजासह वसूल करण्यात यावी, अशी मागणीही पवळ यांनी यावेळी केली.