शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने भारतात प्रथमच कोहळ्यापासून बनविली चेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 11:52 IST

ग्रासरूट इनोव्हेटर :  भारतात प्रथमच कोहळ्यापासून चेरी, टुटीफ्रुटी बनविण्याचे यशस्वी तंत्रज्ञान विकसित केले आहे.  

- राजरत्न शिरसाट (अकोला)

शेतकऱ्यांना खेड्यातच शेतमालावर प्रक्रिया करता यावी, यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने कृषी अवजारांसह कृषी प्रक्रिया यंत्राची निर्मिती केली आहे. बाजारातील गरज लक्षात घेता चेरी, टुटीफ्रुटी तंत्रज्ञान विकसित केले आहे.

सध्या कच्च्या पपईपासून चेरी, टुटीफ्रुटी बनविण्यात येते. त्यासाठी विविध १२ प्रकारची चेरी, टुटीफ्रुटी बनविण्यात आली. पपईपासून बनलेल्या चेरी, तुटीफ्रुटीचा रंग, सुगंध,चव,पसंती इत्यादीबाबत परीक्षण करण्यात आले, तसेच कोहळ्यापासून बनलेल्या चेरीचेही परीक्षण करण्यात आले. या दोन्हीचा अभ्यास, परीक्षण करू न कोहळ्यापासून तयार करण्यात आलेल्या चेरी,टुटीफ्रुटी बनविण्याच्या सर्वोत्तम पद्धतीला निर्धारित करण्यात आले. अकोल्याच्या या कृषी विद्यापीठाच्या कापणी पश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप बोरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी भारतात प्रथमच कोहळ्यापासून चेरी, टुटीफ्रुटी बनविण्याचे यशस्वी तंत्रज्ञान विकसित केले आहे.  

कोहळ्यापासून भुकटी व त्यापासून विविध मूल्यवर्धित पदार्थ या तंत्रज्ञानापासून तयार करता येतात. चेरी, टुटीफ्रुटी तयार करण्यासाठी सुरुवातीला कोहळ्याच्या गराचे तुकडे करू न त्यांना ०.७५ टक्के चुन्याच्या पाण्यात १२ तास ठेवले जाते. त्यानंतर तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन हे तुकडे ६० टक्के साखरेमध्ये १२ तास ठेवण्यात येतात. हे मिश्रण नंतर उकळविले जाते. उकळविण्याच्या शेवटी सोडियम बन्झोएट (०.२५ टक्के) चेरी, टुटीफ्रुटी ६० डिग्री ब्रिक्स गोडव्यापर्यंत तसेच सायट्रिक अ‍ॅसिड (०.०५ टक्के) यात टाकण्यात येते. यानंतर आल्यावर सुकविणे थांबवावे लागते. यातील जास्तीचा साखरेचा पाक गाळून चेरीला पंख्याखाली सुकविण्यासाठी ठेवण्यात येते. त्यानंतर बॅगमध्ये पॅकिंग करून त्याची विक्री करता येते.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी