शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

प्रथमच कृ षी क्षेत्र परम शावक सृष्टी महासंगणकाशी जोडणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 14:15 IST

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची जोड परम शावक सृष्टी या महासंगणकाशी घालून देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शेती क्षेत्रामध्ये महासंगणकासारख्या बाबींचा वापर होणे गरजेचे आहे. असे झाल्यास पीक सुधारणा, मृद व सूक्ष्म मूलद्रव्यांचे विश्लेषण त्याचप्रमाणे कीड व रोग प्रतिबंधकात्मक विश्लेषण करण्यास अतिशय सोपे होईल आणि त्यामुळे कृषी क्षेत्रातील संशोधन व विकासास गती मिळून इतर क्षेत्राप्रमाणे कृषी क्षेत्रातही प्रचंड झपाट्याने सकारात्मक बदल व्हावा, या दृष्टीने केंद्रीय इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान, दळणवळण तथा मनुष्यबळ विकास राज्यमंत्री अ‍ॅड. संजय धोत्रे यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची जोड परम शावक सृष्टी या महासंगणकाशी घालून देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.या क्रांतिकारी महासंगणकाचे लोकार्पण ११ जानेवारी कृषी महाविद्यालय सभागृहात केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री अ‍ॅड. संजय धोत्रे यांच्या हस्ते होणार असून, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले तथा सीडॅक, पुणे या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रेसर संस्थेचे महासंचालक डॉ. हेमंत दरबारी यांच्या विशेष उपस्थितीत होणार आहे. यावेळी महापौर अर्चना मसने, आमदार डॉ. रणजित पाटील, आमदार गोपीकिशन बाजोरिया, शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार रणधीर सावरकर, आमदार नितीन देशमुख, विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य जैन्नुदिन जव्हेरी, गणेश कंडारकर, स्नेहा हरडे, विनायक सरनाईक, मोरेश्वर वानखडे, डॉ. सी. डी. मायी, डॉ. पी. जी. पाटील, अर्चना बारब्दे, विद्यापीठाचे संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता (कृषी) डॉ. प्रदीप इंगोले, संशोधन संचालक डॉ. व्ही. के. खर्चे, संचालक, विस्तार शिक्षण डॉ. दिलीप मानकर उपस्थित राहतील.

काय आहे, परम शावक सृष्टी महासंगणक!महासंगणकाचा वापर करून कृषी क्षेत्रामध्ये सुधारणा करण्यास बराच वाव आहे. ही गरज विचारात घेऊन, कृषी जैव-सूचनांचे साधन म्हणून सीडॅक आपल्याकडे परम शावक सृष्टी प्रणाली सादर करीत आहे. परम शावक सृष्टीचा हवामानाचा त्वरित अंदाज वर्तविण्यासाठी वापर करता होईल. सीडॅकने विकसित केलेले हरिता प्रिया सोल्युशन, जे हवामानाची सूक्ष्म माहिती प्रदान करते. परम शावक सृष्टीमध्ये टँगो आणि अन्वया या सीडॅकच्या सॉफ्टवेअरचासुद्धा समावेश आहे. टँगो सॉफ्टवेअरच्या आधारे कुठल्या पिकाला, कुठले खत, तसेच कुठल्या पिकाला कुठले कीटनाशक वापरता येईल, हे समजून घेऊ शकतो.

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठagricultureशेती