शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

 दहा वर्षात पहिल्यांदाच उमलले सुरणचे फूल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 13:21 IST

दुर्मिळ असे सुरण फूल तब्बल दहा वर्षांनी गीता नगरातील प्रा. जे.आर. शर्मा यांच्या घरातील अंगणात उमलले आहे.

- नितीन गव्हाळे

अकोला: बाजारात गेल्यावर सुरणची भाजी सहज मिळते. सुरण हा जमिनीतील कंद आहे. त्याला मराठीत सुरण तर हिंदीमध्ये जमिकंद म्हणतात. त्याचे शास्त्रीय नाव एमआफोफेलस आहे. अशा कंदाचे दुर्मिळ असे फूल तब्बल दहा वर्षांनी गीता नगरातील प्रा. जे.आर. शर्मा यांच्या घरातील अंगणात उमलले आहे. सुरण फूल जगात सर्वात मोठे मानले जाते. या फुलाला मृत शरीरासारखी दुर्गंधी येत असल्याचे वनस्पतीशास्त्रज्ञ सांगतात.सुरण ही वनस्पतीच्या (कंद) २00 प्रजाती आहेत. ही वनस्पती आशिया, आफ्रिका, आॅस्ट्रेलिया आणि समुद्री बेटांवर आढळून येते. अशी वनस्पती रालतो विज्ञान महाविद्यालयातून सेवानिवृत्त झालेले प्रा. जे.आर. शर्मा यांनी त्यांच्या गीता नगरातील घराच्या अंगणात १५ वर्षांपूर्वी लावली. दोन दिवसांपूर्वी या वनस्पतीवर मोठे फूल उमलले. त्यांना हे अनोख फूल पाहून आश्चर्य वाटले. त्यांनी सहकारी वनस्पतीशास्त्राचे प्रा. अभय भंडारी यांच्या संपर्क साधून सुरण फुलाची माहिती जाणून घेतली. सुरणचे कंद हे भूमिगत असतात. त्याला दुष्काळाचे अन्नसुद्धा म्हटल्या जाते. या वनस्पतीचे फूल (इनफ्लोअरसेन्स) जगात सर्वात मोठे आहे. त्याची उंची २.५ मीटर तर रुंदी १.५ मीटरपर्यंत असू शकते. या फुलाच्या टोकावर तापमान मनुष्याच्या शरीराच्या तापमानाएवढे असते. सडलेल्या मांसाचा जशी दुर्गंधी येते. तशी दुर्गंधी या फुलालासुद्धा येते. त्यामुळे या फुलावर किडे येऊन परागण करतात. दुर्गंधीमुळे या फुलाकडे अनेक कीटक आकर्षित होतात.शिकागोतील गार्डनमध्ये उमलले होते फूल!सुरणचे सर्वात मोठे ४ फूट उंचीचे फूल शिकागो बॉटेनिकल गार्डनमध्ये २९ सप्टेंबर २0१५ मध्ये उमलले होते. त्यावेळी हे अनोखे फूल पाहण्यासाठी २0 हजार लोकांनी गार्डनमध्ये रांग लावली होती. त्यामुळे शिकागो बॉटनिकल गार्डन ३0 सप्टेंबरच्या रात्री २ वाजेपर्यंत खुले ठेवण्यात आले होते.इंग्लंडमध्ये आढळले होते फूलसुरणचे सर्वात मोठे कंद रॉयल बॉटनिकल गार्डन एडीनबर्ग(इंग्लंड) मध्ये आढळून आले होते. त्याचे वजन १५३.७ किलो एवढे प्रचंड होते.

सुरण किंवा जमिकंदाचे फूल दहा ते अकरा वर्षातून एकदा उमलते. याला एकच पान असते. त्याचा व्यास ६ मीटरपर्यंत असतो. त्यात अनेक लहान पाने जोडलेली असतात. या फुलाला मृत शरीरासारखी दुर्गंधी येते. त्यामुळे कीटक या फुलाकडे आकर्षित होतात. शिकागो बॉटनिकल गार्डनमध्ये उमललेल्या दुर्मिळ फुलाला पाहण्यासाठी २0 हजार लोकांनी रांगा लावल्या होत्या.-अभय भंडारी,सेवानिवृत्त प्राध्यापक, वनस्पतीशास्त्र 

 

टॅग्स :Akolaअकोला