शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
2
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
3
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
4
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
5
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
6
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
7
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
8
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
9
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
10
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
11
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
12
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
13
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
14
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
15
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
16
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
17
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
18
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
19
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
20
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
Daily Top 2Weekly Top 5

जनतेच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य!

By admin | Updated: May 10, 2017 07:22 IST

जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी पत्रपरिषदेत त्यांनी संवाद साधला.

अकोला: पोलीस हे जनतेच्या सुरक्षिततेसाठी आणि शहराची कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळण्यासाठी आहेत. त्यामुळे पोलिसांकडून जनतेला तातडीने प्रतिसाद मिळायला हवा. त्यांच्या तक्रारींचा निपटारा करून त्यांना न्याय देण्याची भूमिका आपण बजावू. त्यातही जनतेची सुरक्षा माझ्यासाठी महत्त्वाची आहे. पोलिसांबद्दल जनतेच्या मनात सकारात्मक भावना निर्माण करण्यावर आपला भर राहील, असे जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी सांगितले. पोलीस अधीक्षक कलासागर यांनी सोमवारी रात्री पदभार स्वीकारल्यानंतर मंगळवारी सायंकाळी पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत पत्रकारांसोबत त्यांनी संवाद साधला. अकोल्यात बदली होण्यापूर्वी आपण जिल्ह्याची माहिती घेतली. अकोला शहरासह जिल्ह्यातील काही ठिकाणं संवेदनशील असल्याची माहिती आपल्याला मिळाली. माझ्या कार्यकाळात जिल्ह्यात शांतता नांदून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील, यासाठी आपण प्रयत्न करू. काम करताना कोणाचाही मुलाहिजा करणार नाही. जनतेच्या माझ्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यावर आपण भर देऊ. तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी बसविलेली कायदा व सुव्यवस्थेची घडी, त्यांनी निर्माण केलेला वचक कायम ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे सांगत पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी, गुन्हेगारी कशी नियंत्रित राहील आणि गुन्हे सिद्धी कशी वाढेल, यादृष्टिकोनातून आपण काम करू. काम करताना, जनतेला डोळ्यांसमोर ठेवून आपण काम करू. प्रथम प्राधान्य जनतेला राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. अकोला शहर मला नवीन आहे. शहर व जिल्ह्याचा अभ्यास केल्यानंतर कोणत्या उपाययोजना करायच्या, कोणते निर्णय घ्यायचे, हे निश्चित करून आपण काम करू, असेही कलासागर यांनी सांगितले. पत्रपरिषदेला अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, पोलीस निरीक्षक प्रमोद काळे, पोलीस निरीक्षक विलास पाटील उपस्थित होते.