Fire up shops in the market; Two employees were injured | अलंकार मार्केटमधील दुकानांना आग; आग विझवताना दोन कर्मचारी जखमी
अलंकार मार्केटमधील दुकानांना आग; आग विझवताना दोन कर्मचारी जखमी

अकोला :  सिटी कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील टिळक रोडवरील अलंकार मार्केटमधील पारस मार्केटिंग नामक दुकानासह आणखी एक दुकानाला आग लागल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. ही आग विझवताना मनपाच्या अग्नीशमन विभागाचे दोन कर्मचारी कीरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत.
पारस मार्केटींगचे अलंकार मार्केटमध्ये तीसऱ्या माळयावर दुकान आहे. या दुकानातील साहित्याला रविवारी रात्री उशीरा अचाणक आग लागली. या आगीची माहिती मनपाच्या अग्नीशमन विभागाला मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळावर धाव घेतली. सदरचे मार्केट नियमानुसार नसल्यामुळे वरच्या माळयावर जाण्यास प्रचंड अडचणी होत्या. मात्र त्यानंतरही मनपाचे कर्मचारी आग विझविण्यासाठी माळयावर गेले मात्र साहेबराव सिरसाट आणि अनिल किरोडकर या दोघांचा जिव गुदमरल्याने ते कर्मचारी जखमी झाले. तर मार्केटमध्ये वाहन नेण्यासही प्रचंड अडचण असल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात वेळ लागला. या आगीमध्ये कीरकोळ नुकसान झाले आहे.

 

Web Title: Fire up shops in the market; Two employees were injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.