धावत्या मालगाडीला आग; अनर्थ टळला
By Admin | Updated: April 25, 2017 02:00 IST2017-04-25T02:00:33+5:302017-04-25T02:00:33+5:30
अकोला ते मूर्तिजापूर रेल्वेवर धावत्या मालगाडीच्या एका बोगीला सोमवारी सकाळी ८ च्या सुमारास अचानक आग लागली.

धावत्या मालगाडीला आग; अनर्थ टळला
बोरगावमंजू (जि. अकोला) : अकोला ते मूर्तिजापूर रेल्वेवर धावत्या मालगाडीच्या एका बोगीला सोमवारी सकाळी ८ च्या सुमारास अचानक आग लागली. सुदैवाने हे स्टेशनवरील एका कर्मचाऱ्याच्या लक्षात आल्याने गाडी तातडीने थांबवून आग विझवण्यात आली. त्यामुळे, मोठी हानी टळली.
उमरेडवरून नाशिककडे जात असलेल्या मालगाडीच्या बोगी क्र.१४ मधून धूर निघत असल्याचे बोरगावमंजू येथील एका रेल्वे कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आले. या मालगाडीत दगडी कोळसा असल्याने आग भडकण्याची शक्यता होती. मात्र गाडी ताबडतोब बोरगावमंजू स्टेशनवर थांबवून अग्निशमन दलाला पाचारण केले. (वार्ताहर)
पालिका आयुक्तांचा लाचखोर पीए जेरबंद
पिंपरी (पुणे) : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मावळते आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या स्वीय सहायकाला बारा लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रंगेहाथ पकडले. राजेंद्र शिर्के असे या स्वीय सहायकाचे नाव आहे. तक्रारदार बांधकाम व्यावसायिक असून, त्यांचे थेरगाव येथे अकरा इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यापैकी सात इमारतींना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळाला आहे. इतर चार इमारतींच्या दाखल्याची फाईल सादर करून ते मिळवून देण्यासाठी शिर्के यांनी बारा लाख रुपयांची मागणी केली होती.