मोहाळा येथे आग; आठ जनावरे ठार
By Admin | Updated: May 20, 2017 01:12 IST2017-05-20T01:12:18+5:302017-05-20T01:12:18+5:30
अकोट : अकोट तालुक्यातील मोहाळा येथे गोठ्याला आग लागून चार बकऱ्या व चार पिल्ले ठार झाली, तर अन्य जनावरे जखमी झाल्याची घटना १९ मे रोजी दुपारच्या सुमारास घडली.

मोहाळा येथे आग; आठ जनावरे ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट : अकोट तालुक्यातील मोहाळा येथे गोठ्याला आग लागून चार बकऱ्या व चार पिल्ले ठार झाली, तर अन्य जनावरे जखमी झाल्याची घटना १९ मे रोजी दुपारच्या सुमारास घडली.
मोहाळा येथील सुजाउद्दीन इरशादोद्दीन यांच्या जनावरांच्या गोठ्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीमध्ये गोठ्यातील चार बकऱ्या व चार पिल्ले जळून खाक झालीत, तर गोठ्यातील दोन म्हशी व वगार गंभीररीत्या भाजल्या गेले. यामध्ये सव्वालाख रुपयांचे नुकसान झाले आहे. परिसरातील नागरिकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. अकोट नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळ गाठून आग आटोक्यात आणली. घटनास्थळाला आमदार बळीराम सिरस्कार, जि.प. अध्यक्ष संध्या वाघोडे, माजी सभापती मालवे, तहसीलदार विश्वनाथ घुगे आदींनी भेट दिली. मंडळ अधिकारी व पटवाऱ्यांनी घटनेचा पंचनामा केला.