Fire at Khandala;one bull killed | खंडाळा येथे आग; एक बैल ठार
खंडाळा येथे आग; एक बैल ठार

हातरुण - बाळापूर तालुक्यातील खंडाळा येथे गोठ्याला अचानक आग लागल्याने त्यामध्ये जनावरे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली.  गोठयाची आगीने राखरांगोळी केली. सोमवारी दुपारी आगीची घटना घडली असून यामुळे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज आहे. आग नेमकी कशी लागली यांचे कारण समजू शकले नाही.
शेतकरी बाबुराव भाऊराव अंधारे यांच्या खंडाळा गावातील गोठ्याला अचानक आग लागल्याने धुराचे लोट दिसू लागल्याने ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. या आगीमुळे गोठ्यात बांधलेल्या म्हशी, बैलजोडी भक्षस्थानी सापडली असून कडबा कुटार मोठ्या प्रमाणात जळाले आहे. भाजले गेलेल्या बैलजोडी आणि दोन म्हशीवर घटनास्थळीच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार सुरू केले आहेत. या आगीत मोठ्या प्रमाणात जळाल्याने एक बैल उपचारादरम्यान ठार झाला आहे. तसेच दोन म्हशी व एक बैल गंभीर भाजला आहे. सध्या पावसाळा तोंडावर आला असताना नेमक्या पेरणीच्या वेळेआधी बैल जोडी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने शेतकरी बाबुराव अंधारे यांच्या समोर मोठे संकट निर्माण झाले आहे. या आगीत जनावरांचा चारा जाळून खाक झाला. सध्या गुरांचे भाव गगनाला भिडलेले असतांना जनावरे आगीच्या भक्ष्य स्थानी सापडल्याने शेतकऱ्यासमोर आर्थिक संकट निर्माण झाले असूननुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने मदत देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या आगीच्या नुकसानीचा सोमवारी पंचनामा झाला नव्हता.
 


Web Title: Fire at Khandala;one bull killed
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.