फटाक्यांच्या धुराने श्‍वास कोंडला!

By Admin | Updated: October 26, 2014 00:45 IST2014-10-26T00:45:44+5:302014-10-26T00:45:44+5:30

वायू प्रदूषणामुळे श्‍वसन व घशाचे आजार, कार्बनडाय ऑक्साइडचे प्रमाण वाढले.

Fire cracked the breath! | फटाक्यांच्या धुराने श्‍वास कोंडला!

फटाक्यांच्या धुराने श्‍वास कोंडला!

सचिन राऊत /अकोला
दीपोत्सवाच्या दोन दिवसांमध्ये शहरासह जिल्हय़ात प्रचंड आतषबाजी करण्यात आली असून, यामधून निघालेल्या धुराने आणि शनिवारी दिवसभरातील रिमझिम पावसाने श्‍वसनाचा त्रास वाढला आहे. घसाच्या आजार जडला असून व अस्थमाच्या रुग्णांना अधिक त्रास जाणवू लागला आहे. फटाक्यांच्या धुरामूळे हवेतील प्रदूषणात वाढ झाल्याने श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले. या धुराने ह्यब्रांकायटीसह्ण, जीव गुदमरणे, अस्थमा, दम लागणे अशा प्रकारचे आजार वाढण्याची शक्यता असून, घशामध्ये इन्फेक्शन झालेल्या रुग्णांची संख्याही अधिक आहे.
दिवाळीच्या उत्साहात मोठय़ा प्रमाणात आतषबाजी करण्यात आली असून, यामधून निघालेल्या धुराने ह्यसल्फर डाय ऑक्साईडह्य, ह्यकार्बन मोनाक्साईडह्य आणि ह्यफॉस्फरसह्णचे प्रचंड प्रमाणात वाढले आहे. फटाक्यांमधून निघालेल्या धुरातून विविध घातक रसायन निघत असून, त्यामुळे हवेतील प्रदुषणात वाढ झाली आहे. हवेत सल्फर डाय ऑक्साईड, कार्बन मोनाक्साईडचे प्रमाणात वाढ झाल्याने प्रदुषित झालेल्या हवेने श्‍वसनाच्या आजारात वाढ झाली आहे. याचा त्रास लहान मुले व वृद्धांना अधिक प्रमाणात होत आहे. फटाक्यातील प्रदूषित धुरामूळे ब्रांकायटीस, रायनायटीस, फॅटींगजायटी या सारखे आजार वाढले असून, अशा रुग्णांचे प्रमाणही अधिक आहे. या धुराने दम लागणे, छातीत टोचणे, घशात सुज येणे, सर्दी आणि प्रचंड शिंका, जीव घाबरणे, अँलर्जीक खोकला, छातीत खरखर होणे आणि अस्थमा यासारखे विकार होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. लहान मुलांच्या श्‍वसननलिका अत्यंत नाजुक असल्याने त्यांना या घातक धुराने अधिक धोका असून कायमस्वरुपी श्‍वसनाचा आजार जडण्याची शक्यता अधिक आहे. यासोबतच अस्थमाचा त्रास असलेल्यांना फटाक्यांच्या धुरामुळे अस्थम्याचा अँटॅक येण्याची दाट शक्यता असल्याचा धोकाही तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. दमा, अस्थमा व अँलर्जीक त्रास असलेल्यांचा श्‍वास फटाक्यांच्या धुरामुळे कोंडल्या गेला आहे. दाट वस्तीत असलेल्या नागरिकांना याचा अधिक त्रास होत असल्याचे आढळून आले आहे.
फटाक्यांमधून निघणारा धुरामुळे प्रचंड प्रदूषण होत असून, त्यामुळे श्‍वसनाचे व हृदयाचे विकार वाढतात. यावर उपाय म्हणून नागरिकांनी फटाक्यांचा धूर नाका-तोंडात जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. शक्य असेल तर फटाके फोडणे टाळण्यचा सल्ला श्‍वसन विकार व श्‍वसननलिका दुर्बिण तज्ज्ञ
डॉ. अनिरुद्ध भांबुरकर यांनी दिला.

Web Title: Fire cracked the breath!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.