अकाेला एमआयडीसीतील दाल मीलला आग; दाेन मजुर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2021 19:35 IST2021-08-16T19:35:42+5:302021-08-16T19:35:57+5:30
Fire at Akala MIDC : या आगीत दाेन मजुर जखमी झाले, असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत़.

अकाेला एमआयडीसीतील दाल मीलला आग; दाेन मजुर जखमी
अकाेला : महाराष्ट्र औद्याेगीक वसाहत महामंडळाच्या फेज क्रमांक ४ मधील एका दाल मीलला भीषन आग लागल्याची घटना साेमवारी घडली़. या आगीत दाेन मजुर जखमी झाले, असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत़. तर लाखाे रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथिमक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे़.
एमआयडीसीतील एसके दाल मिलला साेमवारी पहाटे अचाणक आग लागली़. या आगीने राैद्ररुप धारन केल्याने दालमीलच्या दुसऱ्या माळयावर आग पाेहाचली़. त्यामूळे या ठिकाणी झाेपून असलेल्या मजुरांना आगीची झळ पाेहाेचली़. या दरम्यान प्रचंड धुर झाल्याने मजुरांचा जीव गुदमरू लागला़. त्यामूळे एकच धावपळ सुरु हाेताच काही जनांनी खीडकीतून खाली उडया घेतल्या़. यामध्ये दाेन मजुरांना दुखापत झाली, असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़. या आगीची माहीती मीळताच मनपाच्या अग्नीशमन विभागाने तातडीने दाखल हाेउन आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले़. तर यावेळी एमआयडीसी पाेलिसांनीही तातडीने घटनास्थळ गाठून मजुरांचे प्राण वाचिवण्यासाठी प्रयत्न केले़ यावेळी दाेन मजुरांना दुखापत झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत़. तर या मजुरांची प्रकृती धाेक्याबाहेर असल्याची माहीती आहे़.