शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अखेर पिंजर योजनेतील भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाईचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 13:12 IST

अकोला: भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत पेयजल योजनेतील निधी खर्चात अनियमितता केल्याप्रकरणी पिंजर योजनेशी संबंधित जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता, बार्शीटाकळीचे गटविकास अधिकारी, समितीच्या अध्यक्ष, सचिवावर कारवाई प्रस्तावित करण्यात आाल्याची माहिती आहे.

अकोला: भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत पेयजल योजनेतील निधी खर्चात अनियमितता केल्याप्रकरणी पिंजर योजनेशी संबंधित जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता, बार्शीटाकळीचे गटविकास अधिकारी, समितीच्या अध्यक्ष, सचिवावर कारवाई प्रस्तावित करण्यात आाल्याची माहिती आहे. नियमित मुख्य कार्यकारी अधिकारी रुजू झाल्यानंतर ती होण्याची शक्यता आहे.भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत २००८-०९ मध्ये पिंजर येथे पाणी पुरवठा योजनेचे काम हाती घेण्यात आले. त्याची अंदाजित किंमत २ कोटी ५५ लाख ८४ हजार ४०० रुपये होती. त्यातून योजनेचे काम करण्यात आले; मात्र पाणी पुरवठा बंद पडला. त्याचवेळी आधीच्या निधीतून ६६ लाख ७३ हजार ६५७ रुपये शिल्लक होते. ती रक्कम पिंजर ग्रामपंचायतने २०१५-१६ मध्ये टंचाईच्या कामासाठी खर्च केली. त्यासाठी ५० लाखांच्यावर कामाची किंमत असेल, तर जलसंधारण समिती सभेची मंजुरी आवश्यक आहे. ती न घेताच काम करण्यात आले. प्रशासकीय मंजुरी घेतली नाही. कामाचे ई-टेंडरिंग केले नाही, तसेच कामाची मोजमाप पुस्तिका तयार न करताच कंत्राटदाराला देयकही अदा केले. ही संपूर्ण अनियमितता असल्याने याप्रकरणी तक्रारीवरून चौकशी करण्यात आली. तेल्हाराचे सहायक गटविकास अधिकारी यांनी अहवाल डिसेंबर २०१६ मध्येच सादर केला. त्यातील दोषींवर अद्यापही कारवाई झाली नाही. याप्रकरणी दुर्लक्ष केल्याने ही अनियमितता घडल्याचे पुढे आले. या अनियमिततेसाठी तत्कालीन कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपुलवार यांनाही जबाबदार धरण्यात आले. काम सुरू करण्यापूर्वी शासनाची मंजुरी न घेणे, ई-निविदा न करणे, खासगी उद्भवातून पाणी घेताना शहानिशा न करणे, या मुद्यांचे स्पष्टीकरण कोपुलवार यांना सात दिवसांत मागविण्यात आले. ते न मिळाल्यास प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्याची नोटीस त्यांना देण्यात आली होती. सोबतच चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतरही दोषींवर कारवाई न केल्याने बार्शीटाकळीचे गटविकास अधिकारी संदीप भंडारे यांनाही नोटीस देण्यात आली. त्यानंतर पिंजरच्या ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीने ई-टेंडरिंग न करणे, कामाची मोजमाप पुस्तिका तयार होण्यापूर्वीच लाखो रुपये कंत्राटदाराला देणे, याप्रकरणी समिती अध्यक्ष, सचिवावर वसुलीसह फौजदारी कारवाई प्रस्तावित केल्याची माहिती आहे. त्यावर आता लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदBarshitakliबार्शिटाकळी