शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
5
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
9
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
10
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
11
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
12
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
14
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
15
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
16
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
17
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
18
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
19
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
20
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका

अखेर तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना मिळणार मानधन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2019 2:05 PM

शिक्षण संचालनालयाने ५ कोटी ७७ लाख ९५ हजार रुपयांचा निधी मंजूर केला असून, सीएचबी शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.

अकोला : शैक्षणिक सत्र २०१८-१९ मध्ये नियुक्त केलेल्या तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या मानधनाचा प्रश्न अखेर निकाली लागला असून, १५ आॅगस्टपर्यंत त्यांना मानधन मिळण्याची शक्यता आहे. ‘तासिका तत्त्वावरील प्राध्यापक मानधनापासून वंचित’ या आशयाचे वृत्त ‘लोकमत’ने २६ जुलै रोजी प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत शिक्षण संचालनालयाने ५ कोटी ७७ लाख ९५ हजार रुपयांचा निधी मंजूर केला असून, सीएचबी शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करून दर महिन्याला शालार्थ वेतन प्रणालीने मानधन देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता; मात्र या निर्णयाची अंमलबजावणीच झाली नसल्याने नवीन सत्र सुरू होऊनही मानधन मिळाले नाही. वर्षभर सेवा देऊनही मानधन न मिळाल्याने सीएचबी प्राध्यापकांवर उमासमारीची वेळ आली आहे. तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचा हा प्रश्न ‘लोकमत’ने लावून धरल्यानंतर शासनाने या वृत्ताची दखल घेतली. यासंदर्भात अमरावती विभाग उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयांतर्गत ३१ जुलै रोजी विभागातील सर्वच महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पत्र पाठविण्यात आले. त्यानुसार, तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या मागणी केलेल्या रकमेशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी करण्याची सूचना करण्यात आली आहे. २८ फेब्रुवारी २०१९ पर्यंत प्रत्यक्ष घेतलेल्या तासिकांनुसार मागणीचे प्रस्ताव सादर करण्यासंदर्भात कळविण्यात आले होते. त्यानुसार विभागातील जवळपास १५२ महाविद्यालयांनी प्रस्ताव सादर केले होते. महाविद्यालयांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार ५ कोटी ७७ लाख ९५ हजार रुपयांची मागणी संचालनालयाकडे करण्यात आली होती. त्यानुसार, संचालनालयाने ही रक्कम मंजूर केली आहे.

महाविद्यालयांचा खोडाउच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयामार्फत मागविण्यात आलेली संपूर्ण माहिती जोपर्यंत महाविद्यालय पाठविणार नाही, तोपर्यंत पडताळणी पूर्ण होणे शक्य नाही. महाविद्यालयांना ५ आॅगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली असून, बहुतांश महाविद्यालये पूर्ण माहिती पाठवित नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कागदपत्रांच्या पडताळणीनंतरच मानधनतासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या एकूण मानधनाची रक्कम ही त्यांच्या कागदपत्रांच्या पडताळणीनंतरच मिळणार आहे. त्यानुषंगाने महाविद्यालयांना आवश्यक कागदपत्रे उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडे पाठवावी लागणार आहेत.

या दस्तऐवजांची होईल पडताळणी!

  1. सीएचबी प्राध्यापक नियुक्तीचा समिती अहवाल
  2. संबंधित प्राध्यापक रुजू अहवालाची प्रत
  3. विद्यापीठाचे मान्यता पत्र
  4. प्राध्यापकाने तासिका घेतलेला कालावधी
  5. वेळापत्रक ४विद्यार्थी हजेरी
  6. घेतलेल्या एकूण तासिकांची संख्या
  7. घेतलेल्या एकूण प्रात्यक्षिकांची संख्या
  8. एकूण मागणीची प्रतिप्राध्यापकनिहाय रक्कम.
  9.  

संचालनालयामार्फत ५ कोटी ७७ लाख ९५ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. माहविद्यालयांनी ५ आॅगस्टपर्यंत मागितलेल्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी.- डॉ. संजय जगताप, सहसंचालक, उच्च शिक्षण अमरावती विभाग, अमरावती

टॅग्स :AkolaअकोलाProfessorप्राध्यापक