अखेर शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:14 IST2021-06-03T04:14:55+5:302021-06-03T04:14:55+5:30
वाडेगाव : येथील चान्नी फाटा-वाडेगाव रस्त्यावरील स्थानिक पेट्रोल पंपाजवळ रस्त्यावर माती मुरूम टाकणाऱ्या ट्रकमुळे ११ केव्ही जाणाऱ्या विद्युत तारा ...

अखेर शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सुरळीत
वाडेगाव : येथील चान्नी फाटा-वाडेगाव रस्त्यावरील स्थानिक पेट्रोल पंपाजवळ रस्त्यावर माती मुरूम टाकणाऱ्या ट्रकमुळे ११ केव्ही जाणाऱ्या विद्युत तारा तुटल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजता दरम्यान घडली होती. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच, चौथ्या दिवशी शर्तीचे प्रयत्न करून शेतकऱ्याच्या शेतातील वीजपुरवठा जोडणी केल्याने शेतकऱ्याच्या शेतातील पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.
पातूर बाळापूर रस्ता दुरुस्तीचे काम सुरू आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. ट्रकच्या वाहतुकीमुळे तीन-चार विद्युत खांब वाकले असून तारासुद्धा तुटल्या होत्या. या प्रकाराकडे स्थानिक विद्युत कर्मचारी जोडणीची प्रयत्न सुरू होते. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन पुरवठा सुरळीत झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.