अखेर कंझारा येथे आरोग्य तपासणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:24 AM2021-09-12T04:24:02+5:302021-09-12T04:24:02+5:30

धोत्रा शिंदे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या कंझरा येथे आरोग्य पथकप्रमुख डॉ. अमीर हुसेन, आरोग्य सेवकांनी धाव घेऊन सर्वेक्षण ...

Finally the health check-up at Kanjara begins | अखेर कंझारा येथे आरोग्य तपासणी सुरू

अखेर कंझारा येथे आरोग्य तपासणी सुरू

Next

धोत्रा शिंदे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या कंझरा येथे आरोग्य पथकप्रमुख डॉ. अमीर हुसेन, आरोग्य सेवकांनी धाव घेऊन सर्वेक्षण करून जलस्रोत, विहिरींचे जलशुद्धीकरण केले. गप्पी मासे सोडण्यात आले. गावात ग्रामपंचायतीमार्फत फवारणी करण्यात आली, तसेच नाल्या, गटारे साफ करण्यात आली. आशा स्वयंसेविका छायाबाई वाशीमकर यांनी घरोघरी जाऊन २०० कुटुंबाची तपासणी केली. डॉ. अमीर हुसेन यांनी डेंग्यू, मलेरियाविषयी जनजागृती केली.

-----------------------

सिसा बोंदरखेड येथे डेंग्यूसदृश तापाची साथ

अकोला तालुक्यातील सिसा, बोंदरखेड येथे डेंग्यूसदृश तापाची साथ पसरली असून, घराघरांत रुग्ण निघत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बोंदरखेड येथे आरोग्य विभागाकडून उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे, तसेच ग्रामपंचायत प्रशासनाने फवारणी करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Finally the health check-up at Kanjara begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.