अखेर वाडेगावात नाल्यांची साफसफई सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:21 IST2021-02-24T04:21:12+5:302021-02-24T04:21:12+5:30

वाडेगाव: बाळापूर तालुक्यातील वाडेगावात नाल्यांचे सांडपाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांचे आराेग्य धाेक्यात असल्याबाबतचे वृत्त ‘लाेकमत’मध्ये प्रकाशित हाेताच वाडेगाव ग्रामपंचायत प्रशासनाने ...

Finally, cleaning of nallas in Wadegaon started | अखेर वाडेगावात नाल्यांची साफसफई सुरू

अखेर वाडेगावात नाल्यांची साफसफई सुरू

वाडेगाव: बाळापूर तालुक्यातील वाडेगावात नाल्यांचे सांडपाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांचे आराेग्य धाेक्यात असल्याबाबतचे वृत्त ‘लाेकमत’मध्ये प्रकाशित हाेताच वाडेगाव ग्रामपंचायत प्रशासनाने मंगळवारी नाल्यांची साफसफाई सुरू केली.

ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या आठवडी बाजारासह अनेक प्रभागामधील नाल्या तुडूंब भरल्यामुळे रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पसरले हाेते. ग्रामपंचायत प्रशासनाने नाल्या साफसफाईसाठी मंगळवारी कर्मचारी कामाला लावले. दिवसेंदिवस गावातील ग्रामप्रशासनाचे दुर्लक्षपणामुळे गावतील गटारे नाल्या तुडूंब भरल्या होत्या. परिणामी यामधील सांडपाणी रस्त्यावर येत होते. दुर्गंधी व डासांना ग्रामस्थ त्रस्त झाले होते. या नाल्या काढण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच मेजर मंगेश तायडे, शेख सलीम शेख रहुल्ला यांनी उभे राहुन काम करून घेतले. गावातील नाल्यांची सातत्याने स्वच्छता राहावी, अशी मागणी मोहम्मद अफतार व सलीम भाई यांनी केली.

Web Title: Finally, cleaning of nallas in Wadegaon started