Filed a case against those who paid the price of oxen | बैलांचा पट भरणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

बैलांचा पट भरणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

तेल्हारा : तालुक्यातील हिवरखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीत रायखेड येथे बैलांच्या पटाचे आयोजन करणाऱ्या दोघांविरुद्ध पोलिसांनी दि. २१ जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रायखेड येथे एका शेतात बैलांचा पट भरल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे कोरोना संक्रमण प्रतिबंधबाबत शासनाचे आदेश असतानाही विनापरवाना बैलांच्या पटाचे आयोजन करून नागरिकांची गर्दी दिसून आली. बैलांच्या शर्यतीकरिता लोकांकडून प्रवेश फी घेऊन बैलांच्या मालकांना इनामाची रक्कम देऊन पैशांच्या हारजीतचा खेळ चालविताना आढळून आले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रफुल्ल पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शेतमालक नीलेश माणिकराव नेमाडे, आयोजक घनश्याम वसंता नेमाडे, (रा. रायखेड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. या कारवाईत चार बांबू, लाकडी छकडा, लाऊड स्पीकर, असा एकूण ७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास हिवरखेड पोलीस करीत आहेत.

Web Title: Filed a case against those who paid the price of oxen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.