अर्णब गोस्वामी यांच्यावर गुन्हे दाखल करा - सुधीर ढोणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 01:52 PM2020-04-24T13:52:45+5:302020-04-24T13:54:41+5:30

अर्णब गोस्वामी यांच्यावर गुन्हे दाखल करा - सुधीर ढोणे

File a case against Arnab Goswami - Sudhir Dhone | अर्णब गोस्वामी यांच्यावर गुन्हे दाखल करा - सुधीर ढोणे

अर्णब गोस्वामी यांच्यावर गुन्हे दाखल करा - सुधीर ढोणे

Next
href='https://www.lokmat.com/topics/akola/'>अकोला: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची बदनामी केल्याप्रकरणी व हिंदू-मुस्लीम दंगल भडकविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रिपब्लिक चॅनलचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे यांनी केली आहे. स्थानिक जिल्हा पोलिस अधिक्षकांना भेटून त्यांना अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात तक्रार अर्ज सादर करून त्यांनी ही मागणी केली. यावेळी निवृत्त उपजिल्हाधिकारी अशोकराव अमानकर व अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सोशल मिडियाचे जिल्हाध्यक्ष भुषण टाले पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. सुधीर ढोणे यांनी जिल्हा पोलिस अधिक्षकांना दिलेल्या पत्रात नमुद केले आहे की, अर्णब रंजन गोस्वामी यांचे दि. 21/04/2020 रोजी रिपकब्लक चॅनलद्वारे प्रसारित होणा-या "पूछता है भारत" या जाहीर कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यावरून त्यांचे विरूध्द भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 117, 120 व 153, 153 ब, 295अ, 298, 500, 504 व 506 अन्वये गुन्हा दाखल करून कारवाई करावी. सदरचे जाहीर कार्यक्रमात सोनिया गांधी यांच्या बाबत मानहानीकारक वक्तव्ये करून अर्णब गोस्वामी यांनी तमाम काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. तसेच याच कार्यक्रमात त्यांनी हिंदू-मुस्लीम दंगल होईल अशा प्रकारचे भावना भडकविणारी वक्तव्ये जाणीवपूर्वक केलेली आहेत. त्यामुळे धार्मिक भावना भडकविणे व जातीय दंगल घडविण्याचा प्रयत्न करणे या आरोपाखाली अर्णब गोस्वामी यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. सदर अर्णब गोस्वामी हे नेहमीच अशा प्रकारची बदनामीकारक तसेच दोन समाजात भांडणे/दंगली होतील अशा प्रकारची वक्तव्ये करीत असतात. सबब वरील प्रकाराची तात्काळ चौकशी करून अर्णब गोस्वामी यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणीही डॉ. सुधीर ढोणे यांनी केली आहे. तक्रार अर्जावर डॉ. सुधीर ढोणे यांच्यासह अशोकराव अमानकर, अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सोशल मिडियाचे जिल्हाध्यक्ष भुषण टाले पाटील यांच्या स्वाक्ष-या आहेत.

Web Title: File a case against Arnab Goswami - Sudhir Dhone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.