खेट्री येथे दोन गटांत हाणामारी; ११ जणांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:14 IST2021-06-26T04:14:55+5:302021-06-26T04:14:55+5:30

खेट्री येथील दोन्ही गटांत गेल्या काही वर्षांपासून शेतीच्या कारणावरून वाद सुरू आहे. २४ जून रोजीच्या सकाळी दोन्ही गटांत ...

Fighting between two groups at Khetri; Crime against 11 persons | खेट्री येथे दोन गटांत हाणामारी; ११ जणांविरुद्ध गुन्हा

खेट्री येथे दोन गटांत हाणामारी; ११ जणांविरुद्ध गुन्हा

खेट्री येथील दोन्ही गटांत गेल्या काही वर्षांपासून शेतीच्या कारणावरून वाद सुरू आहे. २४ जून रोजीच्या सकाळी दोन्ही गटांत हाणामारी झाली. यामध्ये एका गटातील विश्वनाथ महादेव ताले हे गंभीर झाल्याने त्यांना नागपूर येथे उपचारार्थ हलविण्यात आले आहे. तर दुसऱ्या गटातील गणेश प्रल्हाद ताले हे जखमी असल्याने अकोला येथे हलविले आहे. महादेव गोविंदा ताले यांच्या फिर्यादीवरून आरोपी गणेश प्रल्हाद ताले, भगवंता प्रल्हाद ताले, राहुल भगवंत ताले, महेश भगवंता ताले, सार्थक गणेश ताले, प्रशांत समाधान ताले, यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, तर दुसऱ्या गटातील गणेश प्रल्हाद ताले, यांच्या फिर्यादीवरून आरोपी महादेव गोविंदा ताले, बाळू महादेव ताले, विश्वनाथ महादेव ताले, योगेश महादेव ताले, सदाशिव महादेव ताले, यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, वृत्त लिहीपर्यंत दोन्ही गटांतील एकाही आरोपीला अटक करण्यात आली नव्हती. पुढील तपास ठाणेदार राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक गणेश नावकार करीत आहेत.

Web Title: Fighting between two groups at Khetri; Crime against 11 persons