ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतील लढती उद्या ठरणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:20 IST2021-01-03T04:20:24+5:302021-01-03T04:20:24+5:30

मुदत संपलेल्या जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील २२४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान घेण्यात येणार आहे. २२४ ग्रामपंचायतींच्या २ ...

Fight in Gram Panchayat elections will be tomorrow! | ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतील लढती उद्या ठरणार!

ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतील लढती उद्या ठरणार!

मुदत संपलेल्या जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील २२४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान घेण्यात येणार आहे. २२४ ग्रामपंचायतींच्या २ हजार ५५ जागांसाठी ५ हजार ९६९ उमेदवारांनी दाखल केलेले ६ हजार ५३ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवार, ४ जानेवारी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. त्या अनुषंगाने उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सोमवारी दुपारी ३ वाजेनंतर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतील लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे.

उमेदवारी अर्ज वैध ठरलेल्या

उमेदवारांची अशी आहे संख्या!

तालुका उमेदवार

तेल्हारा ८२२

अकोट ८९५

मूर्तिजापूर ६७७

अकोला १०८७

बाळापूर १०४७

बार्शिटाकळी ७१६

पातूर ७२५

....................................

एकूण ५९६९

Web Title: Fight in Gram Panchayat elections will be tomorrow!