शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
2
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
3
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
5
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
7
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
8
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
9
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
10
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
11
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
12
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
13
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
14
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
15
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
16
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
17
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
18
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
19
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
20
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी

पाचवे राज्यस्तरीय विचार साहित्य संमेलन शनिवारपासून अकोल्यात

By atul.jaiswal | Published: November 18, 2017 5:38 PM

अकोला : राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज राज्यस्तरीय विचार साहित्य संमेलन यंदा २५ व २६ नोव्हेंबर रोजी अकोल्याच्या स्वराज्य भवन प्रांगणात पार पडणार आहे.

ठळक मुद्देसंमेलनाध्यक्षपदी सत्यपाल महाराज राज्यभरातील गुरुदेव भक्तांची राहणार मांदीयाळी

अकोला : विश्वात्मक विचारांची, राष्ट्रीयत्वाची पेरणी करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे समृद्ध विचार जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने गत चार वर्षांपूर्वी सुरु झालेले राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज राज्यस्तरीय विचार साहित्य संमेलन यंदा २५ व २६ नोव्हेंबर रोजी अकोल्याच्या स्वराज्य भवन प्रांगणात पार पडणार आहे. संमेलनाध्यक्षपदी सप्तखंजेरीवादक ज्येष्ठ गुरुदेव प्र्नचारक सत्यपाल महाराज चिंचोळकर, तर स्वागताध्यक्ष म्हणून ज्येष्ठ समाजसेवक कृष्णा अंधारे असणार आहेत, अशी माहिती वंदनिय राष्ट्रसंती श्री तुकडोजी महाराज सेवा समितीचे अध्यक्ष रामेश्वर बरगट यांनी शनिवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.शनिवार, २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ५.३० वाजता ग्रामगीता प्रचारक गोवर्धन खवले यांच्या उपस्थितीत सामुदायिक ध्यान चिंतनाने या संमेलनाची सुरुवात होणार आहे. सकाळी ११ वाजता डॉ. पंदेकृविचे कुलगुरु डॉ. विलास भाले यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. संमेलनासला प्रमुख अतिथी म्हणून आचार्य हरीभाऊ वेरुळकर, ज्येष्ठ किर्तनकार आमले महाराज, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, गुरुकुंज प्रचारप्रमुख दामोदर पाटील, आजीवन प्रचारक भास्करराव विघे, भाजप महासचिव रामदास आंबटकर, खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, काँग्रेस शहराध्यक्ष बबनराव चौधरी, डॉ. गजानन नारे, ज्ञानेश्वर रक्षक, मुगुटराव बेले, संतोष हुशे आदी उपस्थित राहणार आहेत.यानंतर दुपारी २ वाजता ‘आम्ही घडू देशासाठी’ हा परिसंवाद अमरावी विद्यापीठ रासेयो संचालक प्रा. डॉ. राजेश मिरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. दुपारी ४ वा. स्व. अंबरिश कविश्वर स्मृती निबंध स्पर्धेच्या विजेत्यांचा बक्षिस वितरण समारंभ, सायंकाळी ५.३० वाजता ‘आजच्या युवकांची दशा व दिशा’ या विषयावर व्याख्यान, तर रात्री ८ वाजता अ‍ॅड. अनंत खेळकर यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होणार आहे.रविवार, २६ नोव्हेंबर रोजी सकाळी विविध कार्यक्रम पार पडल्यानंतर ११.३० वाजताा अ‍ॅड. विनोद साकरकार यांच्या अध्यक्षतेखाली शेतीविषयक धोरण विषयावर परिसंवाद, त्यानंतर दुपारी १.३० वा. ‘राष्ट्रसंतांना अपेक्षीत महिलोन्नती’ हा परिसंवाद, दुपारी २.३० वा. ‘ग्रामगीता जीवन विकास परिक्षा काळाची गरज’हा परिसंवाद होणार आहे. सायंकाळी ४.३० वा. पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या विशेष उपस्थितीत समारोपीय सत्राला प्रारंभ होईल. रात्री. ८ वा. संदीपपाल महाराज यांच्या राष्ट्रीय प्रबोधनाने संमेलनाची सांगता होईल. संमेलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

टॅग्स :Akola cityअकोला शहरRashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराज