शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

अकोला जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये ‘ई-ग्राम’ सेवेचा बट्ट्याबोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 15:12 IST

अकोला : ग्रामस्थांना ३३ प्रकारची कागदपत्रे देण्यासाठी जिल्ह्यातील ४७७ ग्रामपंचायतींमध्ये ई-ग्राम इन्स्टॉलेशन जानेवारी २०१८ मध्ये पूर्ण झाले.

ठळक मुद्देई-ग्राम प्रकल्पात अकोला जिल्हा ३२ व्या क्रमांकावर फेकला जाण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली आहे. ई-ग्राम प्रकल्पाचे ४७७ ग्रामपंचायतीमध्ये इन्स्टॉलेशनही जानेवारी २०१८ मध्ये पूर्ण झाले.१ ते ३३ नमुन्याची प्रमाणपत्रे देण्यासाठी माहिती भरण्याला गेल्या सहा महिन्यात खो देण्यात आला.

अकोला : ग्रामस्थांना ३३ प्रकारची कागदपत्रे देण्यासाठी जिल्ह्यातील ४७७ ग्रामपंचायतींमध्ये ई-ग्राम इन्स्टॉलेशन जानेवारी २०१८ मध्ये पूर्ण झाले. मात्र, त्यातून सेवा देण्यासाठी आवश्यक माहिती ग्रामसचिवांनी दिलीच नाही. त्यामुळे ग्रामपंचायतींमध्ये अद्याप ही सेवा सुरूच झालेली नाही. त्यामुळे ई-ग्राम प्रकल्पात अकोला जिल्हा ३२ व्या क्रमांकावर फेकला जाण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली आहे.ग्रामीण जनतेला त्यांच्या रहिवासी क्षेत्रातच सर्व सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने पंचायत राज संस्थांमध्ये आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्प सुरू केला. त्या केंद्रातून ग्रामस्थांना हवे असलेले १ ते ३३ नमुन्यातील प्रमाणपत्र मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आपले सरकार, ई-ग्राम सेवा केंद्र स्थापन करण्यात आले. त्या केंद्रातून दिल्या जाणाऱ्या सेवांसाठी ई-ग्राम प्रकल्पाचे ४७७ ग्रामपंचायतीमध्ये इन्स्टॉलेशनही जानेवारी २०१८ मध्ये पूर्ण झाले. मात्र, त्यातून दिल्या जाणाºया १ ते ३३ नमुन्याची प्रमाणपत्रे देण्यासाठी माहिती भरण्याला गेल्या सहा महिन्यात खो देण्यात आला. त्यासाठी ग्रामसचिवांना सातत्याने माहिती मागवण्यात आली. ग्रामपंचायतींचे दप्तर अद्याप केंद्रचालकांना देण्यात आलेले नाही. त्यामुळे ‘ई-ग्राम’ प्रकल्पाची सेवा जिल्ह्यात सुरूच झाली नाही. परिणामी, या उपक्रमात अकोला जिल्हा राज्यात ३२ व्या क्रमांकावर आहे. ही कामगिरी जिल्ह्यासाठी निराशाजनक आहे. ग्रामसचिवांना निर्देश देण्यासाठीचा पाठपुरावा महाआॅनलाइनने सातत्याने केला.

दंड कुणाला करणार..सीएससी-एसपीव्हीने केंद्र स्थापन केल्यानंतर ६० दिवसांत केंद्र चालकाची नेमणूक करणे बंधनकारक आहे. ठरलेल्या मुदतीत केंद्र सुरू न झाल्यास दरदिवसाला ४५० रुपये दंडाची तरतूद करण्यात आली. केंद्र बंद ठेवल्यास संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना आहेत. त्यासाठी ग्रामपंचायत किंवा संबंधितांनी तक्रार करावी लागणार आहे. मात्र, ग्रामपंचायतींकडूनच दप्तर मिळत नसल्याने सेवा सुरू झाली नाही. याप्रकरणी आता कुणाला दंड करावा, हा उलट प्रश्न निर्माण झाला आहे.

पंचायतचे उपमुकाअची जबाबदारीविशेष म्हणजे, ई-ग्राम प्रकल्पाची ग्रामपंचायतींमध्ये यशस्वीपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी यांची आहे. मात्र, कुळकर्णी नेमकी कोणती कामे करतात, ही बाब त्यांच्या कार्यालयातील कर्मचाºयांनाही माहीत नसते. कोणत्याही विषयाची माहिती कुळकर्णी कधीच देत नाहीत. त्यांची ही बेजबाबदार वृत्ती जिल्हा परिषदेची प्रतिमा अधिकच मलिन करण्यास हातभार लावणारी आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाgram panchayatग्राम पंचायत