बाश्रीटाकळी हत्याकांडातील आरोपी पिता-पुत्र कारागृहात

By Admin | Updated: March 28, 2016 01:32 IST2016-03-28T01:32:18+5:302016-03-28T01:32:18+5:30

जलालाबाद येथील गुराख्याच्या खून प्रकरणातील आरोपींना न्यायालयीन कोठडी.

Father-son accused in Basharatkali murder case | बाश्रीटाकळी हत्याकांडातील आरोपी पिता-पुत्र कारागृहात

बाश्रीटाकळी हत्याकांडातील आरोपी पिता-पुत्र कारागृहात

अकोला: बाश्रीटाकळी तालुक्यातील जलालाबाद येथील गुराख्याच्या खून प्रकरणातील आरोपी पिता-पुत्रास पोलीस कोठडी संपल्याने न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
बाश्रीटाकळी येथील जलालाबाद (गोटखेड) येथील संतोष रामभाऊ वाघमारे (३५) या युवकाला गुरुवारी त्र्यंबक विष्णू पवार व चंद्रकांत त्र्यंबक पवार या पिता-पुत्राने लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले होते. त्यामुळे वाघमारे याला जखमी अवस्थेतच कापशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले. उपचारादरम्यान संतोष वाघमारे यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी धाव घेऊन आरोपी त्र्यंबक विष्णू पवार व चंद्रकांत त्र्यंबक पवार या पिता-पुत्रास अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयाने २७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडी संपल्याने दोघांनाही न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. या प्रकरणी आरोपीतर्फे अँड. केशव एच. गिरी व वैशाली गिरी-भारती यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Father-son accused in Basharatkali murder case