दारुड्या मुलाच्या मारहाणीत वडिलांचा मृत्यू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 10:07 IST2020-05-08T10:04:23+5:302020-05-08T10:07:11+5:30
मंगेश धनगाव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दारुड्या मुलाच्या मारहाणीत वडिलांचा मृत्यू!
पिंजर : येथील वॉर्ड क्र. १ मधील वास्तव्यास असलेल्या मद्यपी युवकाने दारू पिल्यानंतर क्षुल्लक कारणावरून वडिलांना व आईला जबर मारहाण केली. या मारहाणीत वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दि.७ मे रोजी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी मंगेश धनगाव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी करण्यात आली आहे. दरम्यान, लॉकडाउनच्या नियम शिथिल करीत राज्यात मद्य विक्रीस सुरूवात झाली आहे. येथील आरोपी मंगेश रमेश धनगाव हा दारू पिउन आल्यानंतर त्याने आईला जेवायला मागितले व आईने जेवण देण्यास विलंब केला म्हणून त्याने वडील रमेश लक्ष्मण धनगाव व आई रुख्मा यांना जबर मारहाण केली. यामध्ये वडील रमेश (५५) यांचा मृत्यू झाला व आई रुख्मा हिच्या पायाला व हाताला जबर मार लागला असून, गंभीर जखमी केले आहे. या प्रकरणी मृतकाचा भाऊ गजानन धनगाव यांच्या तक्रारीवरून आरोपी मंगेश धनगाव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)