ट्रकचा टायर फुटल्याने भीषण अपघात; दोन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 02:03 IST2018-03-05T02:03:18+5:302018-03-05T02:03:18+5:30
मूर्तिजापूर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील बांधकाम सुरू आसलेल्या नदीच्या पुलावर ट्रकचे टायर फुटल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून रविवार, ४ मार्चच्या पहाटे साडेपाचच्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात दोन जण घटनास्थळीच ठार झाले.

ट्रकचा टायर फुटल्याने भीषण अपघात; दोन ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील बांधकाम सुरू आसलेल्या नदीच्या पुलावर ट्रकचे टायर फुटल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून रविवार, ४ मार्चच्या पहाटे साडेपाचच्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात दोन जण घटनास्थळीच ठार झाले.
या अपघातात ट्रकचालक हेमराज बिलालसिंग यादव (२५), रा.कळमना, नागपूर व त्याचा सहायक हेमराज धोंडूजी धांधडे (३४) रा. ससाने प्लॉटस, नागपूर या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सध्या या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. याच कामाचा एक भाग म्हणून हेंडज फाट्याजवळ पुलाचे काम सुरू आहे.
या पुलाजवळून एमपी २२ जी २२४१ क्रमांकाचा ट्रक जात असताना ट्रकचे टायर अचानक फुटले व चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक पुलाच्या सुरू असलेल्या बांधकामात घुसला. या अपघातात ट्रकचालक व सहायक दोघेही ठार झाले. पुलाच्या कामावरील चौकीदार मधुकर सुसतकर यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालकाविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या २७९ व ३०४ (अ) कलमानुसार येथील मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.