फारशी भाषेचा सर्रास केला जातो वापर

By Admin | Updated: August 3, 2016 01:39 IST2016-08-03T01:39:42+5:302016-08-03T01:39:42+5:30

परवलीचा शब्द बदलता राहतो : ‘समलिंगी’ नागरिकांची साखळी वाढत आहे.

Farsi language is widely used in the language | फारशी भाषेचा सर्रास केला जातो वापर

फारशी भाषेचा सर्रास केला जातो वापर

अकोला : 'समलिंगी' नागरिकांमध्ये संवादासाठी वापरली जाणारी भाषा ही दुसर्‍याला सहजासहजी समजत नाही. फारशी भाषेतील अनेक शब्दांची बेमालूमपणे पेरणी करीत मराठी किंवा हिंदीतून अशी मंडळी संवाद साधत असल्याचे समोर आले आहे.
कुठलीही मुळाक्षरे न गिरवता या मंडळींनी चक्क फारशी भाषा आत्मसात केली आहे. अकोल्यापासून थेट नांदेडपर्यंत व जळगाव खान्देश, नागपूरपर्यंत सर्रास फारशी भाषेतील अनेक शब्दांचा 'कोड' लग्वेज म्हणून वापर केला जातो. ही भाषा कोणीही कुणाला शिकविली नाही; परंतु सरावाने सर्वांनाच जमली आहे. एखाद्या नव्या समलिंगी सहकार्‍यासोबत संवाद साधताना यामधील ओळखीच्या शब्दाचा वापर आधी केला जातो. सध्या या भाषेमध्ये ह्यसनी लिऑन व सनी देवलह्ण या अभिनेत्यांच्या नावाचाही कोड म्हणून वापर केला जातो. समोरचा समलिंगी कोती आहे की पंथी, हे समजून घेण्यासाठी ह्यसनी लिऑन व सनी देवलह्ण ही नावे वापरून समोरच्याला संकेत दिला जातो.

फसवणुकीचेही प्रमाण नाही
समलिंगी संबंध ठेवतानाही 'स्टेटस्' चा विचार केला जातो. त्यामुळे आपला सहकारी कोण असावा, याची निवड करताना विशेष काळजी घेतली जाते. विशेष म्हणजे या सर्व प्रकारामध्ये एकमेकांची फसवणूक केल्याच्या तक्रारींचे प्रमाण अतिशय कमी आहे. तसेच सहकारी पळविण्याच्या वृत्तीचीही तेवढय़ा गांभीर्याने दखल घेतली जात नाही, हे विशेष!

उच्चपदस्थ अधिकार्‍यांचाही समावेश
समलिंगी संबंधामध्ये अनेक उच्चपदस्थ अधिकार्‍यांसमवेत सर्वच क्षेत्रातील प्रतिष्ठितांचाही मोठा समावेश आहे. यांची स्वतंत्र अशी साखळी असून, नव्या सहकार्‍यांना त्यामध्ये सामावून घेण्याआधी काटेकोरपणे काळजी घेतली जाते. महाविद्यालयीन तरुणांना या साखळीमध्ये ओढण्यासाठी मोबाइल, कपडे, उंची दारू किंवा मोठय़ा हॉटेलमध्ये जेवणाचे आमिष दाखविले जाते. यामध्ये सर्व मामला हा स्वखुशीचा असल्याने आमिषाला बळी पडणार्‍यांची संख्या वाढती आहे.

Web Title: Farsi language is widely used in the language

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.